SMAT 2025 : अंतिम सामन्यात युजवेंद्र चहल मैदानात उतरला नाही, कारण सामना सुरू झाल्यावर सांगितलं
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झारखंड आणि हरियाणा यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात युझवेंद्र चहल खेळत नाही. अंतिम सामन्यात खेळत नसल्याने हरियाणा संघाला फटका बसला आहे. पण त्याचं कारण त्याने सामन्यानंतर सांगितलं.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी झारखंड आणि हरियाणा यांच्यात लढत होत आहे. हरियाणाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यावेळी प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली आणि युजवेंद्र चहलचं नाव नसल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अंतिम सामन्यात खेळत नसल्याचं स्पष्ट झाल्याने हरियाणा संघाच्या चाहत्यांना आश्चर्य वाटलं. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात न खेळण्याचं कारण काय? वगैरे प्रश्न विचारले जाऊ लागले. असं असताना युजवेंद्र चहलने याबाबतचा खुलासा केला आहे. युजवेंद्र चहलला एकाच वेळी दोन आजारांनी ग्रासलं आहे. त्याला डेंग्यू आणि चिकुनगुनिया झाल्याचं समोर आलं आहे. मागच्या सामन्यातही चहल खेळला नव्हता. चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात खेळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीसाठी माझ्या शुभेच्छा माझा संघ हरियाणासोबत आहेत. मला संघासोबत खेळायचं होतं. पण दुर्दैवाने मला डेंग्यू आणि चिकुनगुनिया झाला. त्यामुळे माझी तब्येत खालावली आहे. डॉक्टरांना फक्त आराम आणि त्यातून बरं होण्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. मी लवकरच बरा होईन आणि मैदानात उतरून गोलंदाजी करेल.’ चहलने पुडुचेरी, पंजाब आणि गुजरात विरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये भाग घेतला होता. तीन सामन्यांमध्ये 27.20 च्या सरासरीने आणि 9.90 च्या इकॉनॉमीने चार विकेट्स घेतल्या.पण त्यानंतर या स्पर्धेत काही खेळला नाही. शेवटचे चार गट फेरीतील सामने आणि संपूर्ण सुपर लीग टप्प्यातील सामने खेळला नाही.
Wishing my team Haryana all the very best for the SMAT finals. I wished to be a part of the team but unfortunately I am down with dengue and chikungunya, which have really taken a toll on my health. The doctors have asked to focus only on rest and recovery. I’ll be back to the…
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) December 18, 2025
दरम्यान हरियाणाने या सामन्यात सुमार गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल. कारण झारखंडने 20 षटकात 3 गडी गमवून 262 धावा केल्या आणि विजयासठी 263 धावांचं आव्हान दिलं आहे. संघाची ही स्थिती पाहता युजवेंद्र चहलची उणीव भासली. कारण संघात असता तर काही अंशी फरक पडला असता. त्याच्या चार षटकांनी बरंच घडलं असू शकलं असतं. चहल हा 2023 मध्ये पहिली विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या हरियाणा संघाचा भाग होता हे विशेष..
