AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehzad Poonawalla : भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारने उडवलं

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईचा अपघात झाला आहे. जाणूनबुजून माझ्या आईला कारने धडक दिली असा शहजाद पूनावाला यांचा आरोप आहे.

Shehzad Poonawalla : भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारने उडवलं
Shehzad Poonawalla
| Updated on: Feb 04, 2026 | 10:47 AM
Share

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईचा अपघात झाला आहे. जाणूनबुजून माझ्या आईला कारने धडक दिली असा शहजाद पूनावाला यांनी आरोप केला आहे. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या आईला एक सफेद कार टक्कर मारताना दिसतेय. “काही तासांपूर्वी एका घृणास्पद माणसाने जाणीवपूर्वक माझ्या आईच्या अंगावर कार घातली. माझी आई गंभीररित्या जखमी झाली आहे. कार चालक तिथून पळून गेला. आईवर लवकरच सर्जरी करावी लागेल. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माझी आई दयाळू आणि चांगल्या व्यक्तींपैकी एक आहे. या वयात त्यांच्यासोबत जे झालं. त्यामुळे मला खूप वेदना होतायत” असं पूनावाला यांनी लिहिलं आहे.

शहजाद पूनावाला यांनी पुणे पोलिसांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे. पुणे पोलीस लगेच त्या व्यक्तीला अटक करुन त्याला शिक्षा होईल हे सुनिश्चित करतील अशी अपेक्षा आहे असं पूनावाला यांनी लिहिलय.

आईचा एक्स रे रिपोर्ट सुद्धा शेअर केलाय

“हे सर्व काय होतय. माझी आई सिनियर सिटीजन आहे. माझा ड्रायव्हर आणि एग्जीक्यूटिव असिस्टेंट सोबत ती गेली होती. जेव्हा ते लोक गॅस भरत होते. तेव्हा तिथे उभी राहून प्रतिक्षा करत होती. तेव्हा तिथे तिला कुठल्यातरी गाडीने धडक दिली. हे मुद्दामून केल्यासारखं वाटतय” असं शहजाद पूनावाला यांचा भाऊ तहसीन पूनावाला यांनी लिहिलय. त्यांनी आईचा एक्स रे रिपोर्ट सुद्धा एक्सवर शेअर केलाय. “आईचं हाड मोडलं. तिला रुग्णालयात दाखल करावं लागलय. पुणे पोलिसांकडे आरोपी विरोधात जलद कारवाई करण्याची मागणी केली आहे. जाणूनबुजून केलं किंवा नशेत केलं. हे तपासातून समोर येईलच. पण ज्येष्ठ नागरिक असलेल्या आईला हा त्रास होतोय. याचं दु:ख होतं” असं लिहिलय.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!