AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanaji Sawant: थांब, तुझी एन्क्वायरीच लावतो, भरसभेत आमदार तानाजी सावंत यांचा बंडखोर उमेदवाराला दम

Tanaji Sawant Warned Candidate: महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही असे म्हणत तानाजी सावंत विरोधी उमेदवारावर बरसले. त्यांनी बंडखोर उमेदवाराला चांगलंच दमात घेतलं. त्याला सज्जड दम ही भरला. सावंत यांचं हे भाषण व्हायरल होत आहे.

Tanaji Sawant: थांब, तुझी एन्क्वायरीच लावतो, भरसभेत आमदार तानाजी सावंत यांचा बंडखोर उमेदवाराला दम
तानाजी सावंतImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 04, 2026 | 10:17 AM
Share

श्रीराम क्षीरसागर/प्रतिनिधी : “थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो,” अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला जोरदार दम भरला. धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट टीका केली. सभा स्थळी येताना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त करत, जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला. आपलाच जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तानाजी सावंत (Tanaji Sawant Warned Candidate) आक्रमक झाले. “महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही,” असे म्हणत त्यांनी बंडखोर उमेदवारावर निशाणा साधला.

तुझ्या बापानं निधी आणला का?

धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात ही सभा झाली. त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेवरून विरोधकांना खडसावले. आज रस्त्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. मी रस्त्यावरून आलो. तो रस्ता विरोधक आपणच केल्याचा दावा करत आहेत. तुझ्या बापानं निधी आणला का? महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे, निधी मी आणला. थांब आता तुझी चौकशीच लावतो. माझा नाद करायचा नाही. मी मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे, असा सज्जड दम आमदार तानाजी सावंत यांनी भरला. जुन्या कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत असल्याने तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे दिसले.

ओमराजे निंबाळकरांवर मोठी टीका

भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना निवडून आणण्याचे ओमराजे निंबाळकर यांचे प्लॅनिंग आहे का अशी लोकात कुजबुज असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी केलाय. तेर जिल्हा परिषद गटाच्या लढतीवरून सक्षणा सलगर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. तेर मध्ये महाविकास आघाडी व्हावी ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती मग ओमराजे निंबाळकर यांनी त्याला केराची टोपली का दाखवली ? , त्यांना नेमकं कोणाला निवडून आणायचे विरोध फक्त दाखवण्यासाठी आहे का? असा सवाल करत त्यांनी निशाणा साधला. तर जिल्हा परिषद निवडणूक न लढण्याची घोषणा करून अर्चना पाटील पुन्हा मैदानात का ? राणा जगजितसिंह पाटील आणि अर्चना पाटलांनी पक्ष खुंटीला बांधला अशी टीका सलगर यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज लढत होतेय . ठाकरे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असा तिरंगी सामना आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील भाजपकडून तेर जिल्हा परिषद गटातून निवडणूक आखाड्यात आहेत. तर राष्ट्रवादीकडून सक्षणा सलगर उमेदवार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही स्वतंत्र उमेदवार रिंगणात आहे.

Follow Us
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?