मंदिर नगरीत मंदिरे अचानक बंद का झाली ? काय कारण आहे ?

| Updated on: Oct 25, 2022 | 3:11 PM

सूर्यग्रहण असल्यामुळे नाशिक शहरातील अनेक मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावेळी मंदिरांना थेट कुलूपच लावण्यात आले आहे.

मंदिर नगरीत मंदिरे अचानक बंद का झाली ? काय कारण आहे ?
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : नाशिककरांना आज अचानक एक विलक्षण बदल नाशिकमध्ये बघायला मिळाला (Nashik Temple) आहे. कधी नव्हे तशी बाब नाशिककरांना दिसली आहे. कोरोना (Corona) नंतर नाशिकमधील सर्वच मंदिरे दिसल्याने नागरिकही चक्रावून गेले आहे. दरम्यान बऱ्याच तासानंतर नाशिककरांना सूर्यग्रहण असल्याने मंदिरे बंद असल्याची बाब समजली आहे. दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी विचारपूरस केल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी सूचना फलकावर मंदिरे सूर्यग्रहण असल्याने बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेले नागरिक हे बाहेरूनच दर्शन घेत आहे.

सूर्यग्रहण असल्यामुळे नाशिक शहरातील अनेक मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावेळी मंदिरांना थेट कुलूपच लावण्यात आले आहे.

नाशिक शहरातील रविवार कारंजा वरील प्रसिद्ध असलेले चांदीचा गणपती मंदिर देखील मंदिर व्यवस्थापनाकडून बंद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

तशा सूचना देखील मंदिराच्या बाहेर असलेल्या फलकावर लावण्यात आल्या असून, हे मंदिर संध्याकाळी सात वाजेपर्यंत बंद असणार आहे.

तसेच शहरातील इतरही अनेक मंदिरे सूर्यग्रहणामुळे बंद करण्यात आली आहे आणि तशा सूचना देखील मंदिर प्रशासनाकडून लावण्यात आल्या आहे.

मंदिर बंद करण्यात आल्यामुळे भाविक आता मंदिराच्या गेटच्या बाहेरून दर्शन घेताना दिसत आहे.

सूर्यग्रहण काळात अनेक पुरोहित हे जप करत असतात, पाणी किंवा जेवण देखील करत नाही, गोडवरीत स्नान करत असतात त्यामुळे मंदिरात कोणीही नसल्याने बंद ठेवली असावी असा एक तर्क लावला जात आहे.