अकोल्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचं नुकसान, बच्चू कडूंचे तातडीनं उपाययोजना राबवण्याचे आदेश

| Updated on: Jul 24, 2021 | 1:20 PM

अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून, यापुढे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, याकरिता उपाययोजना राबवा; मोर्णा नदीचे खोलीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

अकोल्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचं नुकसान, बच्चू कडूंचे तातडीनं उपाययोजना राबवण्याचे आदेश
Follow us on

अकोला : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पूर येऊन नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. पूरग्रस्त भागातील खडकी, हरिहर पेठ, शिवसेना वसाहत, चांगेफळ आणि सुकळी या गावांना भेटी देऊन पाहणी करण्यात आलीय. अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून, यापुढे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, याकरिता उपाययोजना राबवा; मोर्णा नदीचे खोलीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना राबवा

तसेच नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून दिलासा दिलाय. भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना राबवाव्यात आणि मोर्णा नदीचे खोलीकरण करावे, असे निर्देश राज्याचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेत.

पुरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

या पुरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. तर पूरग्रस्त भागात रोगराईचा फैलाव होऊ नये, याकरिता फवारणी तथा आवश्यक उपाययोजना करा, अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला पुन्हा पूर येऊ नये याकरिता जिल्ह्यालगत असलेल्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करा, यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेय. या नुकसानीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून अहवाल सादर करा आणि मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये, याकरिता प्रशासनाने प्राधान्याने कामे करण्याचे निर्देश ही यावेळी अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेत.

संबंधित बातम्या:

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री : चित्रा वाघ

Many villages damaged due to heavy rains in Akola, orders to implement immediate measures