15 बळी घेणाऱ्या दारूसाठीचं मिथेनॉल भिवंडीतून आणलं… तुकाराम मुंढेंच्या टीमची धडक कारवाई; कंपनीवर थेट छापा
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 15 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता या विषारी दारूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचे समोर आले आहे. अशातच आता मिथेनॉल साठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 15 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता या विषारी दारूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचे समोर आले आहे. अशातच आता मिथेनॉल साठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवलेला मिथेनॉल साठा केला जप्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मिथेनॉल साठा जप्त
पुणे जिल्ह्यात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर दारूत मिसळेल्या मिथेनॉल साठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवलेला मिथेनॉल साठा जप्त केला आहे. एफडीएने भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर छापा टाकून 1,526 किलो संशयित मिथेनॉलचा साठा जप्त केला. याच रेक्स इंटरनशल कंपनीकडून मिथेनॉल विकत घेऊन पुण्यातली विषारी दारू बनवल्याचे आले आहे समोर. साठ्याची कोणतीही वैध नोंद आढळली नसल्याचे एफडीएचे म्हणणे आहे. आता कंपनीचे मालक व संबंधितांविरोधात भिवंडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेकडो लिटर दारू जप्त
समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील प्रमुख आरोपी योगेश वानखेडेने मिथेनॉल मिक्स केलेली हातभट्टी दारू हडपसर, गोखलेनगर, दापोडी फुगेनगर या ठिकाणी विक्रीसाठी दिली होती. मिथेनॉल मिश्रित 840 लिटर दारू योगेश वानखेडेने बनवली होती. यापैकी अंदाजे 200 लिटर दारूची विक्री झाली होती. हडपसर येथून 70 लिटर दारू जप्त केली. गोखलेनगर येथून 420 लिटर दारू जप्त केली. दापोडी, फुगेवाडी येथून 155 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
इथेनॉल आणि मिथेनॉलमध्ये कन्फ्यूजन
योगेश वानखेडेला हातभट्टीमध्ये इथेनॉल मिक्स करायचे होते, इथेनॉल पासून दारू बनवली जाऊ शकते ही माहिती त्याने ऑनलाईन शिकली होतीय मात्र इथेनॉल आणि मिथेनॉल यातील फरक न समजल्यामुळे योगेश वानखेडे ने हातभट्टीमध्ये मिथेनॉल मिक्स केल्याची तपासात माहिती समोर आली आहे. हीच दारू पिल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे.