खाटिक समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न, समाजाच्या विविध मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही धनंजय मुंडेंचं आश्वासन

| Updated on: Jun 30, 2021 | 10:41 PM

खाटिक समाज बांधवाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिली. मंत्रालयातील दालनात आखिल भारतीय खाटिक समाजाच्या विविध मागण्यांबाबत धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

खाटिक समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न, समाजाच्या विविध मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही धनंजय मुंडेंचं आश्वासन
खाटिक समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांची बैठक
Follow us on

मुंबई : खाटिक समाजाच्या मागण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. या समाज बांधवाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिली. मंत्रालयातील दालनात आखिल भारतीय खाटिक समाजाच्या विविध मागण्यांबाबत धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे, सहसचिव दिनेश डिंगळे यासह वरिष्ठ अधिकारी तसेच आखिल भारतीय खाटीक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप, सरचिटणीस सुजित धनगर यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (Dhananjay Munde promises to take action on various demands of the Khatik community)

खाटिक समाजाच्या विविध मागण्या या धोरणात्मक निर्णयांच्या आहेत. त्यासाठी पुर्ण अभ्यासा अंती या मागण्या आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून तातडीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती, जात पडताळणी करताना येणाऱ्या अडचणी, विविध योजना, तसंच विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन मुंडे यांनी या बैठकीत दिलं आहे.

खाटिक समाजाकडून मुंडेंकडे विविध मागण्यांचं निवेदन

अनुसूचित जातीतील खाटिक समाज बांधवाना चर्मकार समाजातील गटई कामगारांप्रमाणेच स्टॉल मिळावा, या समाजाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, हिन्दु खाटिक मागासवर्गीय महामंडळ सुरू करावे, आखिल भारतीय खाटिक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथराव (नाना) जाधव यांची जयंती शासनस्तरावर साजरी करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत शेळी मेंढी आठवडा बाजार सुरू करणे, यासह विविध मागण्यांचे निवेदन आखिल भारतीय खाटिक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप व सरचिटणीस सुजित धनगर यांच्यासह सदस्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिले.

अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यात सुरु असणाऱ्या 2 हजार 388 अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार अशा एकूण 8 हजार 104 कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या 2 हजार 388 अधीक्षकांचं मानधन दहा हजार रुपये, 2 हजार 858 स्वयंपाकींचं मानधन आठ हजार रुपये, तर 470 मदतनीसांचं आणि 2 हजार 388 चौकीदारांचं मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 1 जुलै 2021 पासून करण्यात येणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय.

इतर बातम्या :

परदेशींकडे मराठी भाषा डिपार्टमेंट, तीन नव्या दमाच्या IAS ना सीईओची पोस्टिंग, ठाकरे सरकारकडून 7 मोठ्या बदल्या

23 गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटी रुपये द्या, पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारकडे मागणी

Minister Dhananjay Munde promises to take action on various demands of the Khatik community