23 गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटी रुपये द्या, पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारकडे मागणी

पुण्याचे महापौर आणि भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी 23 गावांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. मात्र, आता राज्य सरकारने या गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केलीय.

23 गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटी रुपये द्या, पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारकडे मागणी


पुणे : पुण्याचे महापौर आणि भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी 23 गावांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. मात्र, आता राज्य सरकारने या गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केलीय. “राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागतच; अर्थसहाय्यही द्यावं. पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी हद्द असणारी महापालिका झाली असताना या गावांचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे, याला आमचे प्राधान्य असेल,” असंही त्यांनी नमूद केलं (Pune Mayor Murlidhar Mohol demand 9 thousand crore for 23 village development).

“या गावांसाठी 9 हजार कोटी रुपयांचा निधी द्या”

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “34 पैकी उरलेल्या 23 गावांचा समावेश व्हावा, ही आमची पूर्वीपासूनचीच मागणी होती. या 23 गावांच्या समावेशाबाबत पुणे महापालिका प्रसाशनाला राज्य सरकारकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यानुसार या गावांसाठी 9 हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने कळविले होते. त्यानुसार राज्य सरकारने अर्थसहाय्यची तरतूद करावी, म्हणजे या गावांच्या विकासाला चालना मिळेल.”

फडणवीस सरकारच्या काळात 2017 मध्ये 11 गावांचा समावेश

“खरं तर ही गावे टप्प्या-टप्प्याने घ्यावीत अशी आमची भूमिका होती. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना 2017 मध्ये 11 गावांचा समावेश केला होता. आताही 23 गावांच्या समावेशाचे आम्ही स्वागतच करतो. पण त्यासोबतच गावांच्या विकासासाठी अर्थसहाय्य करावे. म्हणजे गावांच्या विकासाला लवकर गती देणे शक्य होईल,” असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

हद्दवाढीतील गावांबाबत कोणते महत्वाचे निर्णय?

पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसंच हद्दीत समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कट्टीबध्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी बैठकीत केला.

हेही वाचा :

पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

पुण्यात भाजपची एकहाती सत्ता, पण कारभारी अजित पवार? राजकीय चर्चांना उधाण

“उपमुख्यमंत्री कार्यालयातून निमंत्रण, पण महापौरांनी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं”, निमंत्रणाच्या वादावर राष्ट्रवादीकडून खुलासा

व्हिडीओ पाहा :

Pune Mayor Murlidhar Mohol demand 9 thousand crore for 23 village development

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI