पुण्यात भाजपची एकहाती सत्ता, पण कारभारी अजित पवार? राजकीय चर्चांना उधाण

पुणे महापालिकेच्या कारभरावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या संघर्ष पाहायला मिळतोय. आंबिल ओढ्याची घटना असो किंवा कचरा प्रश्न अजित पवारांच्या नावाची चर्चा आहे.

पुण्यात भाजपची एकहाती सत्ता, पण कारभारी अजित पवार? राजकीय चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 7:16 PM

पुणे : पुणे महापालिकेच्या कारभरावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या संघर्ष पाहायला मिळतोय. आंबिल ओढ्याची घटना असो किंवा कचरा प्रश्न अजित पवारांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असली तरी कारभारी अजित पवारच असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. भाजपचे तब्बल 100 नगरसेवक असून भाजपची पुणे महापालिकेत एकहाती सत्ता आहे. असं असताना राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेत अजित पवारांच्या मर्जीतील आयुक्त आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यामार्फत पालिकेत सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय (Political discussions of Ajit Pawar hold on BJP ruled Pune Municipal corporation).

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी बैठक बोलावली आहे. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना या बैठकीचे निमंत्रण दिले असले तरी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिलेले नाही, असा आरोप करत भाजपने राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.

महापालिकेत सत्ता राबवण्यासाठी आयुक्तांचा वापर केल्याचा भाजपचा आरोप

काँग्रेस महापालिकेत सत्ता राबवण्यासाठी आयुक्तांचा वापर करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. भाजपला कारभार करता येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. आंबिल ओढ्याची घटनेतही पालकमंत्री अजित पवारांचे नाव स्थानिक नागरिक घेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे आंबिल ओढ्याच्या भेटीवेळी स्थानिक नागरिकांनी अजित पवारांच्या विरोधात घोषणा दिल्यात.

“महापालिकेत सत्ता जरी भाजपची असली तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडे”

पुणे महापालिकेत सत्ता जरी भाजपची असली तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असतात. हे निर्णय घेताना अजित पवार पूर्णपणे त्यांच्या अधिकारांचा वापर करतात. दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका काबीज करण्यासाठी अजित पवार पूर्णपणे त्यांच्या सत्तेचा, अधिकाराचा उपयोग करत असल्याचाही आरोप भाजपकडून होत आहे.

हेही वाचा :

‘ही’ गोष्ट पुणेकर नेहमी लक्षात ठेवतील, महापौरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

“उपमुख्यमंत्री कार्यालयातून निमंत्रण, पण महापौरांनी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं”, निमंत्रणाच्या वादावर राष्ट्रवादीकडून खुलासा

तेव्हा महापौर झोपले होते का? आंबिल ओढा तोडक कारवाई प्रकरणी नितीन राऊत संतापले

व्हिडीओ पाहा :

Political discussions of Ajit Pawar hold on BJP ruled Pune Municipal corporation

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.