सीबीएसई बोर्डाचा कारनामा, पुस्तकात मंत्री सतेज पाटलांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापला

| Updated on: Oct 19, 2021 | 5:10 PM

सीबीएसईने राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा फोटो थेट ग्रामसेवक म्हणून छापला आहे. इयत्ता तिसरीच्या पुस्तकात पान क्रमांक 70 वर हा फोटो छापण्यात आला असून ग्रामपंचायतचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

सीबीएसई बोर्डाचा कारनामा, पुस्तकात मंत्री सतेज पाटलांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापला
satej patil
Follow us on

मुंबई : देशातील शिक्षणव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत, असा आरोप शिक्षणतज्ज्ञांकडून नेहमीच करण्यात येतो. यात भरीस भर म्हणून की काय सीबीएसईने एक मोठी चूक केली आहे. सीबीएसईने राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा फोटो थेट ग्रामसेवक म्हणून छापला आहे. इयत्ता तिसरीच्या पुस्तकात पान क्रमांक 70 वर हा फोटो छापण्यात आला असून खाली ग्रामपंचायतचे महत्त्व सांगण्यात आले आहे. सीबीएसईच्या या कारनाम्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सतेज पाटील यांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापला

सीबीएसईने इयत्ता तिसरीच्या सोशल स्टडिज या पुस्तकात पान क्रमांक 70 वर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा फोटो ग्रामसेवक म्हणून छापला आहे. या पुस्तकात एका धड्यामध्ये ग्रामपंचायतीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना विषय सोपा व्हावा यासाठी मंत्री सतेज पाटील हे ग्रामसेवक असल्याचे फोटोच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

हीच ती चूक

प्रकार समोर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया

दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. फोटो छापण्यापूर्वी तो नेमका कोणाचा आहे ? त्यामागचा संदर्भ काय आहे ? याची तपासणी कोणी का केली नाही, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. तसेच ही चूक लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणीसुद्धा केली जात आहे.

सतेज पाटील कोण आहेत ?

सतेज पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे. कोल्हापुरात त्यांचं मोठं प्रस्थ असून ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. तसेच ते कोल्हापूरचे पालकमंत्री असून सध्या राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. सतेज हे पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे पुत्र आहेत. 2004 मध्ये त्यांनी करवीर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांना पराभूत केलं होतं. तसेच पुढे 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. 2009 च्या काँग्रेस राष्ट्रवादी सराकरमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे. सध्या ते राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत.

इतर बातम्या :

सावधान ! दिवाळीनंतर कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता, राजेश टोपे यांचा सावधानतेचा इशारा

सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक

VIDEO: ईडीची पुढची कारवाई अशोक चव्हाणांवर?; चंद्रकांतदादा म्हणतात, माझ्या हसण्यातून काय तो अर्थ काढा

(minister satej patil shown as gram sevak in cbse third standard book)