राज्यातल्या प्रत्येक तालुक्याला फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय देणार, पशुसंवर्धन मंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: Feb 15, 2021 | 3:19 PM

राज्यातल्या प्रत्येक तालुक्याला फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय देणार असल्याची मोठी घोषणा पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केली आहे. | Sunil Kedar

राज्यातल्या प्रत्येक तालुक्याला फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय देणार, पशुसंवर्धन मंत्र्यांची मोठी घोषणा
सुनील केदार
Follow us on

नागपूर : राज्यातल्या प्रत्येक तालुक्याला फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय देणार असल्याची मोठी घोषणा पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय. (Minister Sunil kedar Announcement veterinary hospital will be provided to every taluka in the state)

राज्यातील प्रत्येक तालुक्यात 2022 पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात 15 फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात हिरवा झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरु करुन नवीन पर्वाला प्रारंभ केला आहे.

शेतकरी, पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषि आणि कृषीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती आज पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरु होणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

ग्रामीण भागात अशा प्रकारची रुग्णालये सुरु करत असून अद्यापही अशी रुग्णालये प्रत्येक गावात नाहीत. त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. आता शेतकऱ्यांची ही समस्या सुटणार असून, 1962 या नि:शुल्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहचणार असून, ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरु होत असल्याचे समाधान मंत्री केदार यांनी व्यक्त केलं.

(Minister Sunil kedar Announcement veterinary hospital will be provided to every taluka in the state)

हे ही वाचा :

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह, व्यासपीठावर चक्कर येऊन पडल्यानंतर रुग्णालयात दाखल

सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्यांना फस्ट्रेशन आलंय, त्याचं उदाहरण म्हणजे पडळकर : जयंत पाटील