MPSC Results: जाळ अन धूर संगटच! UPSC पाठोपाठ MPSCचा निकाल,निवड झालेल्या उमेदवारांची यादी एका क्लिकवर

| Updated on: May 31, 2022 | 6:01 PM

रोहित कट्टे स्थापत्य अभियांत्रिकीत राज्यात प्रथम आलेला आहे. दरम्यान एमपीएससीनं आजच मुलाखती आयोजित केल्या होत्या मुलाखती झाल्यानंतर काही तासातचं निकाल जाहीर करण्यात आलाय.

MPSC Results: जाळ अन धूर संगटच! UPSC पाठोपाठ MPSCचा निकाल,निवड झालेल्या उमेदवारांची यादी एका क्लिकवर
UPSC पाठोपाठ MPSCचा निकाल
Image Credit source: twitter
Follow us on

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 (UPSC 2021 Final Result) परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला त्यापाठोपाठ आज लगेच एमपीएससीने दोन निकाल (MPSC Results) केले जाहीर केले आहेत. एमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकीचाही (MPSC Civil Engineering) निकाल करण्यात आलाय. एकूण 652 पदांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. रोहित कट्टे स्थापत्य अभियांत्रिकीत राज्यात प्रथम आलेला आहे. दरम्यान एमपीएससीनं आजच मुलाखती आयोजित केल्या होत्या मुलाखती झाल्यानंतर काही तासातचं निकाल जाहीर करण्यात आलाय. एमपीएससीकडून दोन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची यादी –  CLICK HERE

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात प्रियंवदा अशोक म्हाडदळकर अव्वल

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. या परीक्षेत इतर परीक्षेप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. एक नाही, दोन नाही, पहिल्या चार जागा मुलींनीच पटकावल्या. महाराष्ट्रात सुद्धा मुलगीच अव्वल! देशात श्रुती शर्मा तर महाराष्ट्रात प्रियंवदा अशोक म्हाडदळकर अव्वल आहेत. प्रियंवदा अशोक म्हाडदळकरची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. कालच्या परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रातल्या मुलांनीसुद्धा इतर राज्याच्या मुलांना तोड स्पर्धा दिली. महाराष्ट्रातील मुलांची कामगिरी कौतुकास्पद आहे. राज्यातील मुलांचा आकडा पहिल्या शंभर मुलांमध्ये 5 पेक्षा जास्त आहे.

UPSCत मुलींची बाजी!

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय आणि इतर परीक्षांप्रमाणेच या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारलीये! श्रुती शर्माने ऑल इंडिया पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनी स्थान पटकावलं आहे. अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रुतीने सांगितले की, तिचा निकाल चांगला लागेल अशी अपेक्षा होती, पण अव्वल येण्याची अपेक्षा नव्हती.

AIR 10 उमेदवारांची नावं

1.श्रुति शर्मा

2.अंकिता अग्रवाल

3.गामिनी सिंगला

4.ऐश्वर्या वर्मा

5.उत्कर्ष द्विवेदी

6.यक्ष चौधरी

7.सम्यक एस जैनी

8.इशिता राठी

9.प्रीतम कुमार

10.हरकीरत सिंह रंधावा