AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Results 2021: टॉपर्सची या वैकल्पिक विषयांना पसंती! कसा केला अभ्यास, कोणते विषय निवडले, वाचा…

महाराष्ट्रात सुद्धा अनेक विद्यार्थी यूपीएससी 2021 च्या निकालात उत्तीर्ण झाले. काल देशभर या मुलांचं कौतुक करण्यात आलं. ज्याने त्याने आपला विजय आपापल्या पद्धतीनं साजरा केला. या टॉपर्सने नेमका अभ्यास कसा केला?

UPSC Results 2021: टॉपर्सची या वैकल्पिक विषयांना पसंती! कसा केला अभ्यास, कोणते विषय निवडले, वाचा...
टॉपर्सची या वैकल्पिक विषयांना पसंती!
| Updated on: May 31, 2022 | 4:45 PM
Share

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल (UPSC 2021 Final Results) काल जाहीर करण्यात आला आणि इतर परीक्षांप्रमाणेच या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारली! श्रुती शर्माने ऑल इंडिया पहिला क्रमांक (Shruti Sharma UPSC AIR 1) पटकावला आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनी स्थान पटकावलं आहे. अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रुतीने सांगितले की, तिचा निकाल चांगला लागेल अशी अपेक्षा होती, पण अव्वल येण्याची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्रात सुद्धा अनेक विद्यार्थी यूपीएससी 2021 च्या निकालात उत्तीर्ण झाले. काल देशभर या मुलांचं कौतुक करण्यात आलं. ज्याने त्याने आपला विजय आपापल्या पद्धतीनं साजरा केला. या टॉपर्सने (UPSC Toppers) नेमका अभ्यास कसा केला? त्यांचा ऑप्शनल विषय कोणता होता ज्या आधारे त्यांना यूपीएससी उत्तीर्ण होण्यास मदत झाली. जाणून घेऊयात…

श्रुती शर्मा

  • यूपीच्या श्रुती शर्माने यूपीएससी परीक्षेत एअर 1 रँक  मिळवला. बिजनौरची श्रुती यूपीएससी 2021 टॉपर ठरली. मात्र तिचं शिक्षण दिल्लीतून झालंय. सरदार पटेल स्कूलमधून दहावी- बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून तिने इतिहास विषयात पदवी घेतली. त्यानंतर जेएनयूमध्ये एमए हिस्ट्रीमध्ये प्रवेश घेतला पण नंतर ते सोडून दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिस्टमधून पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी घेतली.
  • यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेससाठी जामिया मिलिया इस्लामियाच्या रेसिडेन्शिअल कोचिंगमध्ये (जामिया आरसीए) श्रुतीने तयारी केली होती. श्रुतीचा यूपीएससीमधला वैकल्पिक विषय इतिहास होता. श्रुती शर्मा म्हणते की, तुम्हाला ज्या विषयात सर्वाधिक रस आहे, त्या विषयाची तयारी करणं सोपं जातं.

अंकिता अग्रवाल

  • पश्चिम बंगालची अंकिता अग्रवाल यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये दुसरी टॉपर ठरली आहे. कोलकात्यात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंकिताने दिल्ली युनिव्हर्सिटी सेंट स्टीफन्स कॉलेज डीयूमधून अर्थशास्त्रात बॅचलर डिग्री मिळवली. कोर्पोरेटच्या वर्षभराच्या नोकरीनंतर नोकरी सोडून यूपीएससीची तयारी सुरु केली. ती म्हणते,”मी माझ्या ध्येयाबद्दल स्पष्ट होते, त्यामुळे मी मास्टर्स डिग्री कोर्सला प्रवेश घेतला नाही.”
  • 2019 मध्ये अंकिता यूपीएससीसाठी पात्र ठरली पण तिला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (आयआरएस) मिळाली. पण अंकिताला आयएएस अधिकारी व्हायचं होतं. त्यामुळे २०२१ मध्ये तिने पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. हा तिचा दुसरा प्रयत्न होता. अंकिताने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेससाठी पॉलीटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हे ऑप्शन निवडले.

गामिनी सिंगला

यूपीएससी सीएसई रँक 3 गामिनी सिंगला ही पंजाबच्या आनंदपूर साहिब येथील रहिवासी आहे. तिने २०१९ मध्ये पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये बीटेक संगणक विज्ञान पदवी प्राप्त केलीये. तिला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी मिळाली पण यूपीएससीची तयारी करायची म्हणून गामिनीने ही ऑफर नाकारली. यूपीएससी वैकल्पिक विषयात गामिनीने समाजशास्त्राची निवड केली होती.

25 उमेदवारांमध्ये 15 मुले आणि 10 मुली

यूपीएससी सीएसई 2021च्या निकालात पहिल्या 25 उमेदवारांमध्ये 15 मुले आणि 10 मुली आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता इंजिनिअरिंग, बी.टेक आहे अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिलीये. बीई, आर्टस्/ आर्टस् ह्युमॅनिटीजमध्ये पदवी, वाणिज्य शाखेतील पदवी. आयआयटी,एम्स, व्हीआयटी, मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, जीबी पंत विद्यापीठ, पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज अशा संस्थांमधून या टॉपर्सनी शिक्षण घेतले आहे.

या वैकल्पिक विषयांना पसंती

आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 25 उमेदवारांनी यूपीएससी नागरी सेवेसाठी मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, हिंदी साहित्य, गणित, वैद्यकीय विज्ञान, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, लोकप्रशासन, समाजशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे वैकल्पिक विषय निवडले आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.