मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, मुंबईत तिसरा सी-लिंक, नरिमन पॉईंट ते कुलाबा पुलाचं काम सुरू

| Updated on: Mar 14, 2022 | 12:41 PM

नरिमन पॉईंट ते कुलाबा कफ परेडवर वाहतूक कोंडीमुळे दमछाक होणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नरिमन पॉईंट ते कुलाबा कफ परेड या मार्गावर विनाअडथळा प्रवास करणं शक्य होणार आहे. या मार्गावर 1.6 किलो मीटर लांबीचा पूल बांधण्याचं काम सुरु आहे.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, मुंबईत तिसरा सी-लिंक, नरिमन पॉईंट ते कुलाबा पुलाचं काम सुरू
sea link mumbai
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : नरिमन पॉईंट (Nariman Point) ते कुलाबा (kulaba) कफ परेडवर वाहतूक कोंडीमुळे दमछाक होणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नरिमन पॉईंट ते कुलाबा कफ परेड या मार्गावर विनाअडथळा प्रवास करणं शक्य होणार आहे. या मार्गावर 1.6 किलो मीटर लांबीचा पूल बांधण्याचं काम सुरु आहे. हा प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीनं (MMRDA) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. नरिमन पॉईंट ते कुलाबा कफ परेड या मार्गावर मेट्रोचं (metro) काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. याठिकाणाहून जाणाऱ्यांची मोठी दमछाक होते. सतत सुरु असलेलं मेट्रोचं काम आणि याठिकाणी पडलेलं साहित्य यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मात्र, आता या सगळ्यांपासून लवकरच सुटका मिळणार असून मुंबईत तिसरा सी-लिंक होतोय.

मुंबईकरांचा वेळ वाचणार!

नरिमन पॉईंट ते कुलाबा हा 1.6 किलो मीटर लांबीचा सी लिंक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. समुद्रातून बनवण्यात येणाऱ्या या मार्गावर 4 लेन आहेत. यातील 2 लेन नरिमन पॉईंटच्या दिशेनं तर उरर्वरित 2 लेन या कुलाब्याच्या दिशेनं जाणाऱ्या असणार आहेत. विशेष म्हणजे वांद्रे-वरळी सी लिंकवरुन येणाऱ्या वाहनांना जवळपास अर्धा तास लागतो. मात्र, नरिमन पॉईंट-कुलाबा सी-लिंकमुळे काही मिनिटात कुलाब्याला जाता येऊ शकतं.

काम कधी सुरू होणार?

नरिमन पॉईंट ते कुलाबा सी- सिंकचं काम हे येत्या मे महिन्यात सुरू होणार आहे. कंत्राटदार निवडण्याची प्रक्रिया एमएमआरडीनं सुरू केली आहे. त्यानुसार 7 एप्रिलपर्यंत कंत्राटदाराला काम देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुढील 10 वर्षांसाठी पुलाच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असणार आहे.

सी लिंकमधील विशेष बाबी

बोटींना अडथळा न येण्यासाठी पूल-समुद्रादरम्यान 100 मीटरचे अंतर
पुलावर सायकलिंग ट्रॅक
समुद्रादरम्यान 100 मीटरचे अंतर ठेवलं जाणार
समुद्रात पाहता यावं यासाठी विशेष गॅलरी
वांद्रे-वरळी सी लिंकवरुन लवकर येता येणार

इतर बातम्या

अनिल परब आणि संजय राऊत येत्या काळात तुरूंगात जातील, आमदार रवी राणा यांची भविष्यवाणी

Cotton Crop : आवक कमी होऊनही पांढऱ्या सोन्याचीच चर्चा, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही ‘ऐ नहीं झुकेगा’

‘एक और प्रयास’की जरूरत, ‘या’ चिमुकलीचा Video पाहा; Skating करताना कितीवेळा पडली, पण…