आदित्य ठाकरेंच्या सूचनेनंतर मुंबई पालिकेच्या विशेष समित्यांचे दौरे रद्द

| Updated on: Jan 27, 2020 | 3:24 PM

मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या दौरे अखेर रद्द करण्यात (BMC Special Committee tour cancelled) आला आहे.

आदित्य ठाकरेंच्या सूचनेनंतर मुंबई पालिकेच्या विशेष समित्यांचे दौरे रद्द
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या दौरे अखेर रद्द करण्यात (BMC Special Committee tour cancelled) आले आहेत. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या सूचनेनंतर नगरसेवकांचे दौरे रद्द केले आहेत. येत्या फेब्रुवारीमध्ये हे अभ्यास दौरे होणार होते. पण त्यापूर्वीच हे दौरे रद्द पालिकेतील समिती सदस्यांचा हिरमोड झाला आहे.

मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या दौरे आयोजित केले होते. सुधार समितीचा बंगळूरु-म्हैसूर दौरा, शिक्षण समितीचा उत्तराखंड दौरा, महिला आणि बालकल्याण समितीचा केरळ दौरा, स्थापत्य समितीचा अंदमान-निकोबार दौरा, वृक्ष प्राधिकरण समितीचा सिंगापूर दौरा (प्रस्तावित) आणि आरोग्य समितीचा चीन दौराही होता.

या दौऱ्यांना गटनेत्यांकडून बैठकीची मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे सदस्यांनी स्व: खर्चाने हा दौरा करण्याची तयारी केली होती. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी आदित्य ठाकरेंकडून हिरवा कंदील मिळवण्यात समिती सदस्य यशस्वी झाले होते.

पण चीनमध्ये कारोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्याने आता हे दौरा रद्द करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असताना अभ्यास दौऱ्यांवर अनाठायी खर्च नको अशी टीका होत होती. या टीकेनंतर हे दौरे रद्द करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे दौरे रद्द करण्यात आल्यानंतर समिती सदस्यांचा हिरमोड झाला (BMC Special Committee tour cancelled) आहे.