
मुंबईत लोकलच्या रोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोकलमधून पडून किंवा रुळ ओलांडताना दररोज सरासरी दहा प्रवाशांचा बळी जायचा. हा आकडा सध्या दररोज सरासरी आठ प्रवाशांचा मृत्यू असा कमी आला असला तरी धक्कादायकच आहे. एकीकडे जपानची शिंकानसेन बुलेट ट्रेन 1964 पासून एकाही प्रवाशाचा अपघाती मृत्यू नसल्याचा दाखला देत मिरवित असताना मुंबईत रोज होत असलेला आठ ते दहा प्रवाशांचा मृत्यू ही गोष्ट लाजीरवाणी ठरली आहे. या लोकल प्रवासातील मृत्यूंची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेत ‘बंद दरवाजा’च्या लोकल चालविण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रवाशांसाठी सुरक्षित अशा एसी लोकल आल्या खऱ्या, परंतू त्यांचे भाडे जादा असल्याने सर्वसामान्यांच्या त्या आवाक्या बाहेरच्या ठरल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी एसी लोकलच्या एकेरी तिकीटाचे भाडे पन्नास टक्के कमी केले. त्यामुळे ओला-उबरने प्रवास करणारा वर्ग एसी लोकलला मिळाला. परंतू सर्वसामान्य प्रवासी एसी लोकलला नाक मुरडतच आहेत. एसी लोकलच्या फेऱ्या वाढविल्यास सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी होत असल्याने प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचे काय मत आहे पाहूयात ? ...