पडळकर, खोत यांच्यानंतर आता एसटीच्या संपात गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री

| Updated on: Nov 22, 2021 | 10:10 PM

आता शाळा सुरू झाल्या असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. मात्र आमच्या मागणीसंदर्भात योग्य तो निर्णय येईपर्यंत संप मागे घेणार नाही, कर्मचारी संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

पडळकर, खोत यांच्यानंतर आता एसटीच्या संपात गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री
पडळकर, खोत यांच्यानंतर आता एसटीच्या संपात गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री
Follow us on

मुंबई : गेले 13 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आता अॅड.गोपीचंद पडळकर यांनी या संपात एन्ट्री केली आहे. महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अजूनही कायम आहे. आज मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने पुढील सुनावणीपर्यंत कामगार संघटनांसोबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा.

आंदोलना दरम्यान हिंसक घटना घडल्यास पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. जे कर्मचारी कामावर रूजू होण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यावर इतर संघटनांनी दबाव टाकू नये. कोरोना काळात दीड वर्ष शाळा बंद होत्या. आता शाळा सुरू झाल्या असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. मात्र आमच्या मागणीसंदर्भात योग्य तो निर्णय येईपर्यंत संप मागे घेणार नाही, कर्मचारी संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा देणे सरकारची जबाबदारी

“आझाद मैदानात बसलेल्या सर्व आंदोलकांना योग्य ती सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही भूमिका मी आज माननीय उच्च न्यायालयात मांडली. त्यामुळे पोलीस कमिशनर हेमंत नगराळे आणि जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाची वाट न पाहता या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी पुरवल्या पाहिजेत. लालपरीला दगड मारणारे हे सत्तेतील लोक असू शकतात आणि ही मंडळी या संपात फूट पाडू बघत आहे,” असेही गुणरत्न सदावर्ते यावेळी म्हणाले.

प्राथमिक अहवाल 20 डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचे कोर्टाचे निर्देश

दुसरीकडे एसटी महामंडळातर्फे अॅड पिंकी भंसाली यांनी सांगितले की, ग्राउंड लेवलवर काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत, ते आम्ही निदर्शनास आणून दिले आहेत. स्थानिक स्तरावर लोकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात लोकांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे. जर कोणी अडचण केली तर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आंदोलनात नक्षल अँगल बाबत कोणतीही कागदपत्रे दाखल कोर्टा समोर दाखल केलेले नाही. ते सर्व तोंडी सांगण्यात येत आहेत. यामुळे खरं खोटं काही माहीत नाही. कोर्टात प्राथमिक अहवाल 20 डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही असं आमचं मत आहे, असेही भंसाली म्हणाल्या.

गोपीचंद पडळकरांचे सरकारवर टीकास्त्र

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. मात्र या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार निर्णयक्षम नाही. त्यांच्यात एकमत नाही, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. (After Padalkar and Khot, now the entry of Gunaratna Sadavarten in the end of ST)

इतर बातम्या

Pradnya Satav : विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

‘मराठा समाजाची माफी मागा, पुन्हा आरक्षण मिळवून द्या’, प्रवीण दरेकरांचं ठाकरे सरकारला आवाहन