CM Uddhav Thackeray : तब्बल वर्षभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात! पाहा Photos

| Updated on: Apr 13, 2022 | 2:53 PM

मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मंत्रालयात (Mantralay) विविध विभागांना भेटी दिल्या व कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.

CM Uddhav Thackeray : तब्बल वर्षभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात! पाहा Photos
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मंत्रालयात (Mantralay) विविध विभागांना भेटी दिल्या व कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले. यावेळी पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्याची पाहणी केली. तसेच काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव साप्रवि डॉ. संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस आयुक्त संजय पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्रालयात शिवरायांच्या प्रतिमेस वंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘तुमचे मंत्री मंत्रालयात येतात का?’

शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मंत्रालयात पोहोचले. मंत्रालयातील विविध विभागांना त्यांनी यावेळी भेटी दिल्या. मी आज 1 वर्षानंतर मंत्रालयात आलो आहे. त्यामुळे आढावा घेत आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आढावा घेताना मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हसत हसत काही प्रश्नही विचारले. तुमचे मंत्री मंत्रालयात येतात का, असा प्रश्नही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आज वित्त, महसूल, गृह आणि वन विभागात पाहणी केली सोबतच कर्मचाऱ्यांशी देखील चर्चा केली. मंत्रालयातील फाइल्स बघून सर्व डाटा डिजिटल करण्याच्या देखील मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या.

आणखी वाचा :

Sharad Pawar On Raj Thackeray : राष्ट्रवादी हा जातीय पक्ष आहे? राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना पवारांकडून मुंडे-भुजबळ-पिचड नावाची ढाल

Sharad Pawar On Raj Thackeray : मी अन् अजित पवार वेगळे आहोत वाटतंय का तुम्हाला? राज ठाकरेंच्या गुगलीवर पवार पत्रकारांवरच जेव्हा भडकतात

Sharad Pawar On St Strike: एस.टी. कामगारांना चुकीचं नेतृत्व लाभलं, पवारांची सहानुभूती, चौकशीची मागणी