Mumbai Corona Update : मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! रुग्णसंख्या पु्न्हा हजाराच्या जवळ, वाचा आजचा आकडा काय?

| Updated on: Jun 05, 2022 | 6:58 PM

आज मुंबईकरांसाठी (Mumbai Corona Update) धोक्याची घंटा असणारी कोरोना आकडेवारी आज आली आहे. कारण मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास हजाराच्या जवळ गेलाय. त्यामुळे ही बाबा मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे.

Mumbai Corona Update : मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! रुग्णसंख्या पु्न्हा हजाराच्या जवळ, वाचा आजचा आकडा काय?
सावधान! पुन्हा कोरोनाचा कहर
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : गेल्या दोन वर्षापासून अनेकांचा पगार समाधान कारक वाढत नसेल, आपाला जीडीपी समाधानकारक वाढत नसेल, उद्योगधंदे समाधानकारकपणे वाढत नसतील, त्या सर्वाला कारण आहे, नको असताना पुन्हा पुन्हा वाढणारा कोरोना(Corona Update). हा आत्ता जाईल उद्या जाईल, दोन महिन्याने जाईल, चार महिन्याने जाईल, अशी वाट बघून बघून आपण वैतागून गेलो मात्र कोरोना काही केल्या जाईना, गेल्या काही महिन्यात कमी होणारी रुग्णसंख्या (Corona Numbers) पुन्हा वाढू लागलीय. त्यामुळे पुन्हा राज्याला धडकी भरली आहे. प्रशासन पुन्हा अलर्ट मोडवर आलं आहे. त्यातल्या त्यात आज मुंबईकरांसाठी (Mumbai Corona Update) धोक्याची घंटा असणारी कोरोना आकडेवारी आज आली आहे. कारण मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास हजाराच्या जवळ गेलाय. तर राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 1494 वर पोहोचला आहे.

आजची रुग्णवाढ किती?

आज मुंबईत नव्याने 961 कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची सख्या नव्या रुग्णांच्या तुलनेत कमी आहे. आज 374 बरे होऊन घरी परतले आहेत तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाचीही डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

शनिवारी किती रुग्णसंख्या?

गेल्या काही दिवसांत मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आलेख हा सतत चढताच आहे. शनिवारी मुंबईत 889 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेसारखी तातडीने कोरोनाच्या याही रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्याचं आव्हा महापालिका आणि राज्य सरकारसमोर असणार आहे.

राज्याच्या रुग्णसंख्येतही वाढ

सहाजिकच मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. अनेक बड्या नेत्यांना आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाने पुन्हा गाठलं आहे. आजच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पुन्हा कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी तशी ट्विटरवरून माहिती दिली आहे.