AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Vitthal Mandir : लॉकडाऊनची भीती असलेल्या भक्तांची विठू चरणी धाव, दर्शनासाठी लागल्या तासंतास रांगा

या भीतीने श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची (Pandharpur Vitthal Mandir) गर्दी पंढरपूरात वाढू लागलीय. आज मंदिर परिसर , चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलून गेले आहे. श्री विठ्ठल दर्शनासाठी जवळपास पाच तास लागत आहेत.

Pandharpur Vitthal Mandir : लॉकडाऊनची भीती असलेल्या भक्तांची विठू चरणी धाव, दर्शनासाठी लागल्या तासंतास रांगा
लॉकडाऊनची भिती असलेल्या भक्तांची विठू चरणी धाव, दर्शनासाठी लागल्या तासंतास रांगाImage Credit source: tv9
| Updated on: Jun 05, 2022 | 3:59 PM
Share

पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोनाने (Corona Update) हैराण करून सोडले आहे. अनेकदा लॉकडाऊन झाल्याने धार्मिक स्थळही मागील काही काळात अनेक महिने बंद राहिला आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी झाल्याने पुन्हा थोडी उसंत मिळाली होती. पुन्हा धार्मिक स्थळं (Religious Places) खुली झाली आहेत. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता भक्तांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरू लागले आहे. कारण आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने पुन्हा लॉकाडाऊन लागतं की काय अशी? अशी भिती वक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या भीतीने श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची (Pandharpur Vitthal Mandir) गर्दी पंढरपूरात वाढू लागलीय. आज मंदिर परिसर , चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलून गेले आहे. श्री विठ्ठल दर्शनासाठी जवळपास पाच तास लागत आहेत.

पंढरपूर नगरी पुन्हा ओव्हरपॅक

सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने विठ्ठलभक्तात देखील थोडे भीतीचे वातावरण वाढू लागले आहे . कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्यास पुन्हा एकदा लॉक डाऊन लागेल या भीतीने सध्या रोज हजारोंच्या संख्येने भाविक श्री विठ्ठल दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत . एका बाजूला यंदा विक्रमी आषाढी भरणार असल्याच्या अंदाजाने प्रशासन 15 दिवस आधीपासून तयारीला लागले आहेत.  यातच पुन्हा कोरोना वाढू लागल्याच्या बातम्या येऊ लागल्याने जर लॉक डाऊन पुन्हा सुरु झाला तर श्री विठ्ठल मंदिरही बंद होईल या भीतीने देशभरातील भाविक सध्या रोज हजारोंच्या संख्येने शहरात दाखल होत असल्याने गेल्या काही दिवसापासून पंढरपूर सध्या ओव्हरपॅक असल्याचे चित्र आहे .

राज्य शासनही अलर्ट मोडवर

राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने शासन आणि आरोग्य विभागही पुन्हा अलर्ट मोडवर आलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत टास्क फोर्स आणि मंत्र्यांंच्या रॅपिड बैठका पार पडल्या आहेत. राज्यात पुन्हा मास्कसक्तीचा निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र तुर्तास तरी काही ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.मात्र तरीही लोक अजून कोणत्याही नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका जास्त आहे. अनेक नेत्यांनाही पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच बॉलिवूडही पुन्हा कोरोनाच्या विळख्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळणे गरजेचे आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.