मुंबईकरांनो सावधान! ऑगस्ट महिन्यात मलेरिया, डेंग्युच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

| Updated on: Sep 02, 2021 | 8:13 AM

Dengue | ऑगस्ट महिन्यात मुंबईत मलेरियाचे 790 तर डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले आहेत. यंदा शहरात आतापर्यंत डेंग्यूच्या एकूण 209 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद करण्यात आली. याशविया, गेल्या आठ महिन्यांत गॅस्ट्रोच्या 1848 रुग्णांची नोंद झाली.

मुंबईकरांनो सावधान! ऑगस्ट महिन्यात मलेरिया, डेंग्युच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
डेंग्यू
Follow us on

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आता कुठे सावरत असलेल्या मुंबईवर आता नवं संकट ओढावलं आहे. सध्या मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. सातत्याने बदलणारे वातावरण आणि पाऊस या दोन्ही रोगांच्या प्रसारसाठी पोषक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Dengue and Malaria patients increases in Mumbai)

ऑगस्ट महिन्यात मुंबईत मलेरियाचे 790 तर डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले आहेत. यंदा शहरात आतापर्यंत डेंग्यूच्या एकूण 209 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद करण्यात आली. याशविया, गेल्या आठ महिन्यांत गॅस्ट्रोच्या 1848 रुग्णांची नोंद झाली.

मुंबईत साथीच्या रोगांचे थैमान

जानेवारी महिन्यापासून मुंबईत मलेरियाचे 3338, लेप्टोस्पायरोसिसचे 133 रूग्ण, डेंग्यूचे 209, गॅस्ट्रो आजाराचे 1848 रुग्ण आढळून आले आहेत. तर काविळीचे 165 आणि स्वाईन फ्लू आजाराचे 45 रुग्ण सापडले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी (बी), परळ(एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम(एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत.

डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर पालिका प्रशासनाकडून संबंधित परिसरांमध्ये वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. कीटकनाशक विभागाने 13 लाख 15 हजार 373 घरांची पाहणी केली असून 11 हजार 492 डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत.

मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे?

जर लोकांचा ताप 2-3 दिवसात कमी होत नसेल तसेच थंडी, पुरळ येणे, डोकेदुखीशी होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे .हे लक्षणे मलेरिया, डेंग्यूची देखील असू शकतात. लहान मुले आणि वृद्धांकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात ताप उलट्या आणि जुलाब आणि डोळे पिवळसर होणे, कावीळ सारखी लक्षणे दिसताच पोटविकार तज्ञांचा सल्ला घ्या.

सम लक्षणांमुळे कोविड रुग्ण ओळखून त्यादृष्टीने अचूक उपचार करणे आव्हनात्मक ठरत आहे. डेंग्यू आणि मलेरियाला दूर ठेवण्यासाठी, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती काढून टाकली पाहिजेत. पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था आहे याची खात्री करून घ्या. डास चावणे टाळण्यासाठी पूर्ण बाहीचे कपडे घाला आणि डास प्रतिबंधक आणि जाळी वापरा आणि वेळोवेळी फवारणी करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या:

नवी मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ

मुंबईकरांवर साथीच्या आजारांचे संकट डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढला!

डेंग्यू, मलेरिया सारख्या पावसाळी आजारांमुळे कोव्हिड संसर्गाचा धोका दुप्पट, डॉक्टरांनी दिला इशारा

(Dengue and Malaria patients increases in Mumbai)