मुंबईकरांवर साथीच्या आजारांचे संकट डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढला!

विनायक डावरुंग

| Edited By: |

Updated on: Aug 04, 2021 | 2:31 PM

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरिया डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, लेप्टो या पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे.

मुंबईकरांवर साथीच्या आजारांचे संकट डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढला!
mumbai municiple corporation

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट हद्दपार करण्यात पालिकेला यश आले असतानाच आता मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट ओढावले आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरिया डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, लेप्टो या पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट गडद होताना दिसत आहे. (The risk of dengue, malaria, lepto, gastro increased in Mumbai)

दरम्यान, पावसाळी आजारांमुळे आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसला तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 2020 मध्ये वर्षभरात मलेरियाचे 5007 रुग्ण आढळले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे 240 रुग्ण 8 मृत्यू, डेंग्यूचे 129 रुग्ण 3 मृत्यू आणि गॅस्ट्रोचे 2549, ‘एच1एन1’चे 44 रुग्ण आढळले होते.

यावर्षी 1 जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत गॅस्ट्रोचे एकूण 2318, लेप्टोचे 96, डेंग्यूचे 77, गॅस्ट्रोचे 1572 तर ‘एच1एन1’चे 28 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाची रुग्णसंख्या तुलनेने दुप्पट होत असते. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही.

त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासह इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा

मुंबईत 20 वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी, कुठे काय स्थिती?

(The risk of dengue, malaria, lepto, gastro increased in Mumbai)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI