AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dietary Supplements : नॅचरल म्हणून बिनधास्त खाऊ नका, या 7 सप्लीमेंट्सपासून सावध,अन्यथा किडनी…

Kidney Health Tips: आपण दैनंदिन जीवनात विविध कारणांसाठी खात असलेले काही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः आपल्या किडनी आणि यकृतासाठी धोकादायक असतात. चला जाणून घेऊया

Dietary Supplements : नॅचरल म्हणून बिनधास्त खाऊ नका, या 7 सप्लीमेंट्सपासून सावध,अन्यथा किडनी...
Dietary Supplements Health Risks
| Updated on: Feb 15, 2026 | 8:25 PM
Share

Can Supplements Damage Your Liver: अनेकदा लोक चांगल्या प्रकृतीसाठी सप्लीमेंट सुरक्षित मानत असतात.परंतू सत्य परिस्थिती जरा वेगळी आहे. अलिकडेच अमेरिकेची प्रसिद्ध नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानूसार हर्बल आणि डायएटरी सप्लीमेंट्सला खाद्य उत्पादनाच्या कॅटगरीत ठेवले जाते. म्हणजे यांना आहाराची कमतरता पूर्ण करण्यासाठी दिले जाते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी ते सुरक्षित असतीलच असे नाही. जर किडनी आणि लिव्हर आधीच कमजोर असेल तर काही सप्लीमेंटच्या या अवयवांवर दबाव येऊ शकतो. चला तर पाहूयात कोणत्या सप्लीमेंटपासून सावध रहायला हवे हे पाहूयात…

ग्रीन टी एक्सट्रॅक्ट

ग्रीन टी बहुतांशी लोकांसाठी सुरक्षित आहे. परंतू CLD Clinical Liver Disease जर्नलमधील माहितीनुसार ग्रीन टी एक्सट्रॅक्टच्या गोळ्या कॅटेचिन्स, खासकरुन एपिगॅलोकॅटेचिन गॅलेटची मात्रा खूप जास्त असते. जास्त प्रमाणात हे घेतल्यानंतर लिव्हरला सूज आणि गंभीर जखमांचे ते कारण होऊ शकते. ज्यांना आधीच लिव्हरची समस्या आहे त्यांनी यापासून दूर राहावे.

हाय-डोस प्रोटीन पावडर

हाय-डोज प्रोटीन पावडर देखील धोकादायक ठरु शकते. बॉडी बिल्डींगमध्ये वजन वाढवण्यासाठी घेतले जाणारे प्रोटीन सप्लीमेंट जर गरजेहून जास्त घेतले तर किडनीवर अतिरिक्त दबाव येऊ शकते. अतिरिक्त प्रोटीनमुळे नायट्रोजन युक्त घाणेरडे पदार्थ बाहेर करण्यासाठी किडनीला जास्त मेहनत करावी लागते. ज्यास क्रॉनिक किडनी डिसिजच्या रुग्णांची स्थिती वेगाने बिघडू शकते.

फॅट-सोल्यूबल व्हिटामिन्स

फॅट-सोल्यूबल व्हिटामिन्स सारखे A, D, E आणि K शरीरात साठल्याने ते सहजपणे शरीरातून बाहेर पडत नाहीत. जास्त प्रमाणात व्हिटामिन्स ए लिव्हरवर दबाव टाकू शकते आणि गंभीर क्षतिला निमंत्रण देऊ शकते. व्हिटामिन्स D आणि E देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यानंतर खास करुन किडनी वा लिव्हरची समस्या असणाऱ्या लोकांना नुकसान पोहचवू शकते.

आयर्न सप्लीमेंट

आयर्न सप्लीमेंट तपासणी केल्याशिवाय घेणे खतरनाक होऊ शकते. आयर्न गरजेचे असते, परंतू याचे जास्त प्रमाण लिव्हरला जाम करुन हेमोक्रोमॅटोसिस नावाची स्थिती निर्माण करु शकते. Journal Statpearlsच्या नुसार हा रोग शरीरातील पेशीत आयर्नचा अत्यंत जमावाशी जोडलेला आहे. ज्यामुळे अनेक अवयव नीट काम करु शकत नाहीत.

हर्बल उपाय

काही हर्बल उपायांनी देखील नुकसान होऊ शकते. कॉम्फ्रीमध्ये असे तत्व आढळतात जे लिव्हरला गंभीर क्षति पोहचवू शकते. मोनोपॉझच्या लक्षणावर उपचारासाठी वापरले जाणारे ब्लॅक कोहोश याने लिव्हर टॉक्सिसिटी होते.वजन कमी करण्याच्या उत्पादनात गार्सिनिया कंबोजिया वापरले जाते, त्यामुळे लिव्हरला जखमा होऊ शकतात. अनेक पारंपारिक जडी- बुटीत सक्रीय तत्वांचे प्रमाण आणि शुद्धतेवर कठोर नियंत्रण नसते त्यामुळे ती किडनीसाठी हानिकारक असतात.

ज्येष्ठमधाच्या कांड्या

ज्येष्ठमधात ग्लायसिराइजिन असते, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते आणि पोटॅशियम कमी करु शकते. जेष्ठमध किडनी आणि हृदय रोगांच्या रुग्णांसाठी खतरनाक ठरु शकते. यामुळे असे सप्लीमेंट ज्यात मिनरल अधिक असतील त्यांना घेताना सावधानता बाळगायला हवी.

डिटॉक्स वा फॅट-बर्निंग गोळ्या

डिटॉक्स वा फॅट-बर्निंग गोळ्या देखील धोकादायक असू शकतात. यात स्टीमुलेंट, डाययुरेटिक वा अज्ञात तत्वांच्या मिश्रण असू शकते. ज्यामुळे लिव्हर मेटाबॉलिझम आणि किडनी फिल्ट्रेशनला प्रभावित करु शकते. खास करुन लिव्हरला या केमिकलचे विघटन करण्यासाठी अधिक श्रम पडतात, ज्यामुळे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज वाढू शकते.

Follow Us
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक
संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास, ठाकरे, राष्ट्रवादीच्या बैठक.