AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suraj Chavan Tweet | अंजली दमानियांनी उघड केलेला फोन कॉल डेटा खरा की Fake? राष्ट्रवादी नेते सुरज चव्हाणांच्या पोस्टमुळे एकच खळबळ

Suraj Chavan Tweet | अंजली दमानियांनी उघड केलेला फोन कॉल डेटा खरा की Fake? राष्ट्रवादी नेते सुरज चव्हाणांच्या पोस्टमुळे एकच खळबळ

| Updated on: Apr 05, 2026 | 2:12 PM
Share

समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी अलीकडेच रुपाली चाकणकर तसेच इतर बड्या नेत्यांच्याचा अशोक खरातसोबत झालेला फोन कॉल डेटा समोर आणला होता. या प्रकरणी आता नवा वाद समोर आला आहे. जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे तपशील सगळ्यांसमोर आणण्यासाठी सामाजिक कर्यकर्ते काम करत आहेत. मात्र अलीकडे एका महत्त्वाच्या मुद्याने सगळ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी अलीकडेच रुपाली चाकणकर तसेच इतर बड्या नेत्यांच्याचा अशोक खरातसोबत झालेला फोन कॉल डेटा समोर आणला होता.

या फोन कॉलच्या डेटा संदर्भात राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी एक खळबळजनक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी अंजली दमानिया यांचा उल्लेख रिचार्जवाल्या ताई असा केला आहे. पुढे ते म्हणाले, एकदा अंजली दमानियांनी अशोक खरातचा डेटा अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअप द्वारे कळवल्याचं सांगतेले तर एकदा AI वरुन मिळवल्याचं सांगितलं तर रिचार्जवाल्या ताईंनी कुठलं AI अॅप डिटेल्स देतं हे सांगावं असं थेट वक्तव्य केलं आहे.’आता या वक्तव्यावर अंजली दमानिया काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाच ठरेल.

Published on: Apr 05, 2026 01:52 PM
Follow Us