Buldhana Rahul Bondre | माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नकार, म्हणाले..
बुलढाण्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या एका वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यांनी पत्रकारांना उदाहरण देता महिलांसंदर्भात आक्षेपार्य वक्तव्य केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणवार राहुल बोंद्रेंनी स्पष्टच उत्तर दिलं.
बुलढाण्यातील (Buldhana) काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शिवसेना आमदार (MLA) संजय गायकवाड यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. त्याच, पर्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोंद्रे यांची जीभ घसरली. त्यांनी महिलांबाबत केलेल्या एका आक्षेपाहार्य विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांनी यावेळी उदाहरण देताना सांगितलं की, कोणी महिला असते.. तिला दाखवावं लागतं किती पतीव्रता आहे, ती मोठ कुंकू लावते, मोठ मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते..” असे उदाहरण राहुल बोंद्रे यांनी दिले होते. त्यांनी माफी मागावी किंवा शब्द मागे घ्यावा असे देखील सांगितले जात होते मात्र त्यांनी याला स्पष्ट नकार देत सांगितले की, मी चुकीचे काही बोललोच नाही…., त्यामुळे शब्द मागे घ्यायचा प्रश्नच नाही. मी फक्त माझी पक्षाबाबतची निष्ठा विचारणाऱ्यांना उदाहरण दिलं.
Published on: Apr 05, 2026 05:09 PM
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच

