Latur News | लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आलेलं ज्वारी पिक जमीनदोस्त
लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले.
लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले.
महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यावेळी शेत मालकाने सांगितले की, लाखो रुपये खर्च करुन 2 एकर जमीनीवर ज्वारी पिक लावलं होतं मात्र सलग तीन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपीठीमुळे सगळंच्यासगळं पिक उद्ध्वस्त झालं. शेतकऱ्यांना घारत वापरण्याइतकं देखील धान्य उलेलं नाही. अवकाळीमुळे सगळंच मातीमोल झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. बळीराजकडे आता नष्ट झालेलं पिक कापणीचेही पैसे नाहीत. शेतकऱ्यांवर अगदी कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे. कोणाताही, शासनातील अधिकारी, तलाठी, नेता अवकाळीमुळे झालेलं नुकसान पहायलासुद्धा आलेला नाही, असंही या वेळी शेतकऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Published on: Apr 05, 2026 01:16 PM
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण

