पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. आज सकाळपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांपर्यंत पोहोचल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीची पातळी धोक्याच्या दिशेने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही सखल भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याची माहितीही समोर आली आहे.
महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नदीकाठच्या भागात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
Published on: Jul 06, 2026 06:18 PM
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड