Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला…
नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा एजाज खान हिच्यावर कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी तौसिफ बिलाल आत्तार यालाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र तौसिफविरोधात इतर 5 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली आहे.
दरम्यान, संबंधित गुन्ह्यातील मुख्य संशयित दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नाशिकमधील या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 06, 2026 07:51 PM
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण

