AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs LSG : W,W, शमीचा कहर, सलग 2 चेंडूत हैदराबादच्या ओपनिंग जोडीचा गेम, हेड-अभिषेक माघारी

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याने माजी संघ सनरायजर्स हैदराबादच्या ओपनिंग जोडीचा झटपट गेम केला. शमीने अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेड या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

SRH vs LSG : W,W, शमीचा कहर, सलग 2 चेंडूत हैदराबादच्या ओपनिंग जोडीचा गेम, हेड-अभिषेक माघारी
Abhishek Sharma Mohammed Shami Travis HeadImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 05, 2026 | 5:28 PM
Share

आयपीएल 2026 च्या (IPL 2026) दुसऱ्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पंतचा हा निर्णय लखनौच्या गोलंदाजांची अचूक ठरवला. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याने हैदराबादच्या ओपनिंग जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर प्रिन्स यादव आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत हैदराबादला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे आता हैदराबाद घरच्या मैदानात पलटवार करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

शमीकडून हैदराबादच्या ओपनिंग जोडीचा गेम

ट्रेव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा हैदराबादची सलामी जोडी कशी बॅटिंग करते हे क्रिकेट चाहत्यांना चांगलंच माहित आहे. त्यामुळे या सामन्यातही हेड-अभिषेकच्या बॅटिंगकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र शमीने डावातील पहिल्याच ओव्हरमधील सहाव्या बॉलवर अभिषेक शर्मा याची शिकार केली. शमीने अभिषेकला मनिमरन सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं. अभिषेकला भोपळाही फोडता आला नाही.

त्यानंतर शमीने हैदराबादच्या डावातील तिसऱ्या आणि आपल्या कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर लखनौला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली. शमीने ट्रेव्हीस हेड याचा काटा काढला. शमीने हेडला एडन मार्करम याचा हाती कॅच आऊट केलं. हेडने 7 धावा केल्या. अशाप्रकारे शमीने हैदराबादच्या सलामी जोडीला सलग 2 चेंडूत आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे शमी हॅट्रिकवर होता. मात्र शमील सलग तिसरी विकेट घेण्यात अपयशी ठरला. सलामी जोडी बाद झाल्याने हैदराबादचा स्कोअर 2 आऊट 8 असा झाला.

कॅप्टन इशान किशन अपयशी

ओपनिंग जोडी आऊट झाल्याने चाहत्यांना कॅप्टन इशान किशन याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र इशाननेही निराशा केली. प्रिन्स यादव याने इशानला 1 रनवर बोल्ड केलं. प्रिन्सनंतर चेक फाडून विकेट घेण्याचा जल्लोष करणाऱ्या दिग्वेश सिंह राठी यानेही कमाल केली.

लाईव्ह स्कोअरकार्ड

दिग्वेशने लियाम लिविंगस्टोन याचा कार्यक्रम केला. दिग्वेशने लियामला कॅप्टन ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. पंतने लियामचा जबरदस्त कॅच घेतला. लियमाने 20 चेंडूत 14 धावा जोडल्या. लियाम आऊट झाल्याने हैदराबादची स्थिती 7.1 ओव्हरमध्ये आऊट 26 अशी झाली. त्यामुळे आता हैदराबाद या स्थितीतून कमबॅक करणार की लखनौ झटक्यावर झटके देत 20 ओव्हरआधीच यजमान संघाला ऑलआऊट करणार? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल