T- Raja | रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर उद्धवस्त करून तिथे….
तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रामनवमी निमित्त आयोजित सभेत त्यांनी केलेल्या भाषणात काही वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधानं केल्याची चर्चा रंगली आहे.
तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रामनवमी निमित्त आयोजित सभेत त्यांनी केलेल्या भाषणात काही वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधानं केल्याची चर्चा रंगली आहे. औरंगजेबाची कंबर उखडून तिथे शौचालाय बांधलं पाहिजे, हि कंबर हटवण्यासाठी मावळ्यांची गरज असेल तर लाखो हिंदू तिथे येण्यास तयार आहेत असं वक्तव्य टी-राजा सिंह यांनी केलं आहे. तसेच, अनधिकृत मदरशांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत मदरशांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय, स्वसंरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रत्येक हिंदू कुटुंबाने शस्त्र बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, त्यांच्या वक्तव्यांवरून नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 05, 2026 01:14 PM
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....

