मोठी बातमी! नदीने ओलांडली धोक्याची पातळी! 250 नागरिक… मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा
आळंदी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सुमारे 250 हून अधिक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.
आळंदी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सुमारे 250 हून अधिक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून अनेकांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच शाळा, मंदिर परिसर आणि सखल भागांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तास पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून बचाव पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.
Published on: Jul 06, 2026 11:37 AM
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...

