Chandrakant patil On Kharat Case | खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर, चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे.
फसवणुक आणि भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरात या प्रकरणाने सध्या राज्याभराची झोप उडवली आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर तसेच इतर अनेक बड्या नेत्यांची नावेदेखील समोर आली आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केले होते तसेच अनेक व्यापाऱ्यांना लुबाडले होते. आरोपांच्या ढीगावर स्वतःच्या लुबाडीचं राज्य उभारणाऱ्या अशोक खरातसोबत अनेक जण असल्याचं समोर आलं आहे. यामधील एक नाव म्हणजे चंद्रकांत पटील. सुषमा आंधारे यांनी चद्रकांत पाटलांवर अशोक खरातशी संबंध असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणाबाबत चंद्रकांत पटलांना विचारले तेव्हा त्यांनी थेट आणि सुचक विधान केलं. याशिवाय त्यांनी इतर महत्त्वाच्या मुद्यांवरही भाष्य केलं.
चंद्रकांत पाटलांनी सुषमा आंधारेंच्या आरोपांवर भाष्य करते सांगितले की, ‘देवेंद्र फडविसांनी विधानसभेत तसेच परिषदेत या बाबत निवेदन केलं आहे. अशा प्रकारचे प्रकरण हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर आहेत. तपास सुरु आहे लवकच सत्य समोर येईल’.
Published on: Apr 05, 2026 03:26 PM
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण

