BMC च्या चतुर्थश्रेणी कामगारांची हेराफेरी, पत्नीच्या नावे कंपनी उघडून पालिकेकडून कोट्यवधींची कंत्राटं

विनायक डावरुंग

| Edited By: |

Updated on: Jul 09, 2021 | 8:38 AM

अर्जुन नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायजेस आणि कंपनीने गेल्या दीड वर्षात एक कोटी 11 लाख रुपयांची कामे मिळवली आहेत. तर रत्नेश भोसलेची पत्नी रिया भोसले यांच्या आर आर एंटरप्रायजेस आणि कंपनीला 65 लाख रुपयांची कामे मिळाली आहेत.

BMC च्या चतुर्थश्रेणी कामगारांची हेराफेरी, पत्नीच्या नावे कंपनी उघडून पालिकेकडून कोट्यवधींची कंत्राटं
mumbai municiple corporation

मुंबई : मुंबई महापालिकेच्या डी विभागातील दोन कामगारांनी आपल्या बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करुन कोरोना काळात पालिकेकडूनच कोट्यवधी रुपयांची कामं मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागात चतुर्थश्रेणी शिपाई असलेले अर्जुन नराळे आणि देखभाल विभागातील शिपाई पदावर असलेले रत्नेश भोसले यांनी आपापल्या पत्नींच्या नावे कंपनी सुरु केल्याचा आरोप आहे. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. (BMC class four workers allegedly gave contract to company opened on wife’s names)

काय आहे प्रकरण?

अर्जुन नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायजेस आणि कंपनीने गेल्या दीड वर्षात एक कोटी 11 लाख रुपयांची कामे मिळवली आहेत. तर रत्नेश भोसलेची पत्नी रिया भोसले यांच्या आर आर एंटरप्रायजेस आणि कंपनीला 65 लाख रुपयांची कामे मिळाली आहेत. रत्नेश भोसले आधी डी विभागात होते, आता बांद्राला एच पश्चिम विभागात कार्यरत आहेत.

नियम काय सांगतो?

मुंबई महापालिका अधिनियमानुसार पालिकेत नोकरीला असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला पालिकेची अशी कंत्राटे घेता येत नाहीत. परंतु या दोघांनी मात्र नियम धाब्यावर बसवत स्वत:च्या पत्नींच्या नावे कंपनी उघडून कोट्यवधींची कामे मिळवली आहेत.

स्क्रू ड्रायव्हर ते गाड्या, सबकुछ

पालिकेच्या डी विभागात कोरोना काळात कुठलीही वस्तू लागली तरी त्याचा पुरवठा करण्याचे काम या दोन कंपन्यांनी केलं. स्क्रू ड्रायव्हरपासून कॉम्प्युटर पार्टपर्यंत आणि टेबलपासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंत सर्व काही पुरवठा या दोन कंपन्यांनी केला. यात कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिमीटर, इलेक्ट्रिक केटल, स्टीमर या वस्तूंचाही समावेश आहे.

चतुर्थ श्रेणीतील दोन कामगार एवढे मोठे धाडस अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याशिवाय करणं शक्य नाही. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पालिकेच्या वॉर्ड स्तरावर खरेदी करण्यात आलेली आहे, या सर्व खरेदी व्यवहाराची चौकशीची गरज आता व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

दिनो मोरिया हा BMC चा सचिन वाझे; सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील; नितेश राणेंचं सूचक विधान

कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात, आर्थिक मदतीसह वारसांना नोकरी मिळणार

(BMC class four workers allegedly gave contract to company opened on wife’s names)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI