दिनो मोरिया हा BMC चा सचिन वाझे; सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील; नितेश राणेंचं सूचक विधान

Nitesh Rane | बॉलिवूडमध्ये चार-पाच चित्रपट करण्यापलीकडे दिनो मोरियाची विशेष ओळख नाही. मात्र, हा दिनो मोरिया मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कोणतेही काम चुटकीसरशी करुन देऊ, असे इतरांना सांगत फिरतो.

दिनो मोरिया हा BMC चा सचिन वाझे; सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील; नितेश राणेंचं सूचक विधान
दिनो मोरिया आणि नितेश राणे
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 11:40 AM

मुंबई: अभिनेता दिनो मोरिया याच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) शिवसेनेविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. दिनो मोरिया (Dino Moria) हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. याप्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला. (BJP MLA Nitesh Rane take a dig at Shivsena over Dino Moria)

नितेश राणे यांनी शनिवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी दिनो मोरिया प्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केले. बॉलिवूडमध्ये चार-पाच चित्रपट करण्यापलीकडे दिनो मोरियाची विशेष ओळख नाही. मात्र, हा दिनो मोरिया मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कोणतेही काम चुटकीसरशी करुन देऊ, असे इतरांना सांगत फिरतो. दिनो मोरियाची कोणाशी मैत्री आहे?, असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला.

अभिनेता दिनो मोरियावर ‘ईडी’ची कारवाई

संदेसरा घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अभिनेता दिनो मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने या दोघांची अनुक्रमे 1.4 कोटी आणि 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल 14500 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन एका बँकांना चुना लावला होता. याप्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि दिनो मोरिया (Dino Moria) यांचेही आर्थिक लागेबांधे असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे ‘ईडी’कडून गुन्हेगारी स्वरुपात मोडणाऱ्या आर्थिक व्यवहाराइतक्या रक्कमेची संपत्ती जप्त केल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: अभिनेता दिनो मोरियावर ‘ईडी’ची कारवाई; सव्वा कोटींची संपत्ती जप्त

(BJP MLA Nitesh Rane take a dig at Shivsena over Dino Moria)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.