धुळवड खेळण्याच्या नादात कळंब समुद्रात पाच जण बुडाले

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रकिनारी धुळवड खेळायला गेलेले पाच जण बुडाले. वसईतील दोन कुटुंबातील सात जण समुद्रकिनारी धुळवड खेळायला गेले होते, त्यापैकी पाच जण बुडाले होते. या पाच जणांपैकी एकाचा मृतदेह सायंकाळी सापडला होता, तर चार जण बेपत्ता होते. मात्र, आता या चार जणांचाही मृतदेह सापडला आहे. बुडालेल्या पाच जणांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. वसई पश्चिम परिसरातील […]

धुळवड खेळण्याच्या नादात कळंब समुद्रात पाच जण बुडाले
Follow us on

मुंबई : नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रकिनारी धुळवड खेळायला गेलेले पाच जण बुडाले. वसईतील दोन कुटुंबातील सात जण समुद्रकिनारी धुळवड खेळायला गेले होते, त्यापैकी पाच जण बुडाले होते. या पाच जणांपैकी एकाचा मृतदेह सायंकाळी सापडला होता, तर चार जण बेपत्ता होते. मात्र, आता या चार जणांचाही मृतदेह सापडला आहे. बुडालेल्या पाच जणांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.

वसई पश्चिम परिसरातील गोकुलपार्क या इमारतीत राहणाऱ्या गुप्ता आणि मोर्या कुटुंबाबातील सात जण हे धुळवड खेळण्यासाठी कळंब समुद्रकिनारी गेले होते. सकाळी या सर्वांनी इमारतीच्या परिसरात धुळवड खेळली. त्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास ते नालासोपारा येथील कळंब समुद्रकिनारी धुळवड खेळण्यासाठी गेले. समुद्रात खेळत असताना दुपारी 3 च्या सुमारास समुद्राला भरती आली. खेळण्याच्या नादात या लोकांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि सातपैकी पाच जणांना समुद्राच्या लाटेने आपल्यासोबत वाहून नेले.

निशा कमलेश मौर्या, प्रशांत कमलेश मौर्या, प्रिया कमलेश मौर्या, कंचन दिनेश गुप्ता, शीतल मुकेश गुप्ता अशी  समुद्रात बुडालेल्यांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, अर्नाळा सागरी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी यांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण यातील प्रशांत कमलेश मौर्या यांचा मृतदेह हाती लागला. तर इतर चार जण बेपत्ता होते. त्यानंतरही शोधकार्य सुरुच होते. यादरम्यान मध्यरात्री दोन जणांचे आणि सकाळी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. होळीच्या दिवशी झालेल्या या घटनेने गोकुलपार्क इमारतीत शोककळा पसरली आहे.