मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा; मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग निर्मूलनात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

| Updated on: Apr 05, 2022 | 9:42 PM

मध्य रेल्वेकडून यासाठी एकूण 177.11 कि. मीटरचे काम करण्यात आली आहेत. त्यामध्य अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ प्रकल्पाचा सोलापूरवाडी-आष्टी ही 31 किमी लाईन केली गेली. तर ताकारी-किर्लोस्करवाडीचे 8.46 कि.मी.चे दुहेरीकरण झाले आहे.

मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा; मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग निर्मूलनात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
मध्य रेल्वेचे विद्युतीकरण आणि लेव्हल क्रॉसिंग पूर्ण
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः मध्य रेल्वेच्या पायांभूत सुविधांमध्ये आता सुधारणा करण्यात येणार असून मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग (Manned level crossing) निर्मूलनात आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करण्यात आली आहे. 2021-22 या वर्षात, मध्य रेल्वेने नवीन लाईन, दुहेरीकरण, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी लाईन आणि विद्युतीकरण (Electrification) यासह विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये महत्वाचे टप्पे पार पडले आहेत. मध्य रेल्वेसाठी (Central Railway) नवीन लाईन, दुहेरीकरण, तिसरी लाईन आणि पाचवी आणि सहावी लाईनची आतापर्यंतची सर्वोच्च पूर्णता कार्यान्वित करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेकडून यासाठी एकूण 177.11 कि. मीटरचे काम करण्यात आली आहेत. त्यामध्य अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ प्रकल्पाचा सोलापूरवाडी-आष्टी ही 31 किमी लाईन केली गेली. तर ताकारी-किर्लोस्करवाडीचे 8.46 कि.मी.चे दुहेरीकरण झाले आहे. आंबळे-राजावाडी 4.72 किमी झाले आहे. तर पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पातील लोणंद-साल्पा-आदारकी हा प्रकल्प 17 किमी आणि किर्लोस्करवाडी-आमनापूर-भिलवडी13.66 किलो मीटरचे काम करण्यात आले आहे.

तिसरी लाईनही पूर्ण

दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पाचा अंकाई- अंकाई किल्ला यासाठी 4.58 किमी, दौंड-वाडी दुहेरीकरण प्रकल्पातील भालवणी-वाशिंबे 26.37 किमी, वर्धा-बल्हारशा मार्गाची जळगाव-भादली 12 किमी, सोनेगाव-हिंगणघाट 16.17 किमी आणि इटारसी-नागपूर मार्गाची काटोल-कोहली 25.15 किमी या दरम्यानची तिसरी लाईनही पूर्ण करण्यात आली आहे. ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी लाईनचा हा प्रकल्प 18 किमी प्रमाणे करण्यात आला आहे.

शंभर टक्के विद्युतीकरणही पूर्ण

तसेच पुणे-मिरज-कोल्हापूर (सिंगल लाईन) आणि दौंड-सोलापूर-वाडी विभाग पूर्ण झाल्यामुळे 339 किमीचे विद्युतीकरण केले गेल्यामुळे सुवर्ण चतुर्भुज मार्गांचे शंभर टक्के विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेने 2021-22 मध्ये रोड ओव्हर ब्रिज/रोड पुलांखालील आणि मर्यादित उंचीच्या भुयारी मार्गांद्वारे 90 मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग काढून टाकण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्यात आली आहे. मुंबई विभाग 6; भुसावळ विभाग 33, नागपूर 20, पुणे 20 आणि सोलापूर 11 मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग काढून टाकण्यात आली आहेत. 2020-21 मध्ये 78 लेव्हल क्रॉसिंगच्या निर्मूलनाची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी करण्यात आली होती.

विद्युतीकरण पर्यावरणपूरक

या कामानिमित्त मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, क्षमता वाढल्याने आता मध्य रेल्वेला रेल्वे वाहतुकीतील अडचणी दूर करण्यास मदत होणार आहे. तसेच विद्युतीकरण पर्यावरणपूरक आहे आणि मध्य रेल्वे 2022-23 मध्ये शंभर टक्के मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करणार आहे. लेव्हल क्रॉसिंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या होती, या मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंगचे निर्मूलन रस्ते वापरकर्त्यांसाठी तसेच रेल्वेसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. यामुळे रेल्वेला लागणारा वेळ टाळला जातो.

संबंधित बातम्या 

मुंबईत महागाईचा भडका, आज मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या किमतीत मोठी वाढ

Labor Society : दरेकरांसारखेच मजूर प्रकरण यवतमाळमध्येही? करोडपती “मजुरा”विरोधात तक्रार

Breaking : ‘राज्यात काँग्रेसमध्ये कुठलाच समन्वय नाही’, काँग्रेस आमदारांची दिल्ली दरबारी खंत! थेट सोनियांकडे तक्रार