दहावीनंतर आता बारावीच्या मार्कशीटवरुन ‘नापास’ शेरा हद्दपार

| Updated on: Dec 05, 2019 | 12:05 AM

नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आता 'कौशल्य विकासास पात्र' असा शेरा दिला जाणार आहे. नुकतंच महाराष्ट्र शासनाने याबाबतचा निर्णय जाहीर केला (HSC fail remark) आहे.

दहावीनंतर आता बारावीच्या मार्कशीटवरुन नापास शेरा हद्दपार
Follow us on

मुंबई : दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार (HSC fail remark) होणार आहे. कारण नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार (HSC fail remark) आहे. यापूर्वी हा निर्णय फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित होता. मात्र नुकतंच महाराष्ट्र शासनाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी याबाबतचा निर्णय जाहीर केला (HSC fail remark) आहे.

शासनाने काढलेल्या निर्णयानुसार, इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारा एक मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास समोरच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबवण्यात येणार (HSC fail remark) आहे.

यापूर्वी दहावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कौशल्य विकासास पात्र’ हा शेरा दिला जात होता. मात्र आता त्याच धर्तीवर बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार (HSC fail remark) आहे.

आतापर्यंत दोन विषयांत नापास असेल तर गुणपत्रिकेवर एटीकेटी हा शेरा दिला जायचा. तर तीन विषय किंवा त्याहून जास्त विषयात नापास असणाऱ्यांसाठी नापास हा शेरा होता. मात्र या निर्णयानंतर तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात नापास होणाऱ्यांना ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.

यामुळे दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे त्या तरुणांना स्वंय रोजगाराची संधीही मिळू (HSC fail remark) शकेल.