केतकी ब्राह्मण असल्याने तिला पाठिंबा देता का, ? या प्रश्नाला तृप्ती देसाईंनी दिले हे उत्तर

| Updated on: May 18, 2022 | 5:32 PM

केतकी चितळे या वादाला राजकीय आणि सामाजिक वळण लावून राजकीय नेते आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांकडून वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. तृप्ती देसाई (Trupti Desai), सदाभाऊ खोत, राम शिंदे यांनी केतकीच्या या प्रकरणावरुन राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. आता भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी यातून वेगळात मुद्दा उपस्थित केला आहे.

केतकी ब्राह्मण असल्याने तिला पाठिंबा देता का, ? या प्रश्नाला तृप्ती देसाईंनी दिले हे उत्तर
केतकी चितळे वादात तृप्ती देसाईंची उडी
Follow us on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविरोधात टिव्ही मालिका अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्या फेसबुक पोस्टप्रकरणी केतकीला अटक करुन तिच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे तिला 19 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे म्हणजे सोशल मीडिया आणि वाद हे ठरलेले समीकरण. आता या वादाला राजकीय आणि सामाजिक वळण लावून राजकीय नेते आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांकडून वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. तृप्ती देसाई (Trupti Desai), सदाभाऊ खोत, राम शिंदे यांनी केतकीच्या या प्रकरणावरुन राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. आता भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी यातून वेगळात मुद्दा उपस्थित केला आहे.

जातीचा प्रश्नही उपस्थित

केतकी चितळेच्या पोलीस कारवाईवर प्रश्न उपस्थित करुन तृप्ती देसाई यांनी त्यावरुन जातीचा प्रश्नही उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी केतकी चितळेला पाठिंबा दिला तर सगळे जातीवर येतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांविषयीही प्रश्न उपस्थित करत त्या म्हणाल्या की, अनेकजण म्हणतात त्या चितळे आहेत तुम्ही देसाई आहात. आणि त्या ब्राह्मण आहेत तुम्ही पण ब्राह्मण आहात म्हणून तुम्ही केतकीला सपोर्ट करताय असंही त्यांनी म्हटलं आहे.

मला सर्वधर्म समभावाचा

यावेळी त्यांनी हेही सांगितले की, सोशल मीडियावर लोकांना सांगितलं आहे की, मी ब्राह्मण मुळीच नाही. मी 96 कुळी मराठा आहे. मी ज्या 96 कुळी मराठ्यांच्या घरातून येते तिथे मला सर्वधर्म समभावाचा आणि परखड मत मांडण्याचा अधिकार आणि संस्कार दिले आहेत.

त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा

त्यामुळे माझं मत मी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. तर केतकी चितळेवर प्रश्न उपस्थित करुन त्या म्हणाल्या की, केतकी चितळेला ज्या प्रकरणात अटक केली आहे व तिच्यावर वेगवेगळे कलम लावली आहेत, त्याच प्रमाणे ज्यांनी तिच्या अंगावर शाई फेकली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

शरद पवार असा थेट उल्लेख नाही

यावेळी त्यांनी केतकीचं समर्थन केलं असून केतकीच्या पोस्टमध्ये थेट नाव घेण्यात आलेलं नाही असं म्हणत त्यांनी सांगितले की, केतकी चितळेच्या पोस्टमध्ये शरद पवार असा थेट उल्लेख नाही त्यामुळे ते नेमकं शरद पवारांबद्दलचं बोलले आहे का या विषयावर कदाचित न्यायालयामध्ये ही केस टिकू शकणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तिने जर जाणूनबुजून पवारांविरोधात लिहिलं असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटले आहे.