उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ची जबाबदारी घेताच मित्रपक्षालाच विचारला जाब; लोकशाहीविषयीही व्यक्त केली चिंता; राहुल-प्रियंकाची केली पाठराखण

| Updated on: Aug 08, 2022 | 5:31 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले की, पोलिसांनी राहुल गांधींना धक्काबुक्की करुन प्रियंका गांधींना पोलिसांनी फरफटत ओढून घेऊन गेले आहेत. तर तुम्ही कोणतीही कारवाई करा, मी तुमच्या ईडीला घाबरत नाही असंही राहुल गांधींनी बेधडकपणे सांगितले आहे"

उद्धव ठाकरेंनी सामनाची जबाबदारी घेताच मित्रपक्षालाच विचारला जाब; लोकशाहीविषयीही व्यक्त केली चिंता; राहुल-प्रियंकाची केली पाठराखण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबईः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे (Samana) मुख्य संपादक म्हणून कार्यभार आता हातात घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी सामानाची जबाबदारी हातात घेताच त्यांनी पहिल्याच संपादकीयमधून (Editorial) महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस आणि अन्य अपक्ष पक्षांवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संपादकीयमधून निशाणा साधताना म्हटले आहे की, महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरवाढीविरोधात काँग्रेसने गेल्या आठवड्यात देशव्यापी आंदोलन पुकारले मात्र त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने म्हटले आहे की, सध्या केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांतील नेत्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावत आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये असलेली एकजूट कमकुवत होत आहे, असे असतानाही विरोधी पक्ष एकत्र न येता वेगवेगळ्या वाटेवरून चालत आहेत. विरोधी पक्षातील नेते काँग्रेसच्या आंदोलनापासून दूर गेल्याने देशातील लोकशाहीसाठी हे ‘चिंताजनक’ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल आणि प्रियंकाची पाठराखण

सामनाचे मुख्य संपादक असलेले खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी संपादकपदाची जबाबदारी घेतल्या घेतल्या त्यांनी केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नेतृत्व केलेल्या आंदोलनाचे कौतूक करुन विरोधी पक्ष त्यांच्यापासून लांब गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारविरोधात काँग्रेस रस्त्यावर

सामानाच्या संपादकीयामध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आणि सरकारविरुद्ध भूमिका मांडल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनाही प्रचंड आक्रमक झाली होती मात्र, अन्य विरोधी नेत्यांनी यावेळी संशयास्पद भूमिका मांडली असल्यानेच या सगळ्या घटना लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

शेपूट घालणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा

संपादकीयमध्ये केंद्र सरकारवरही निशाणा साधताना ईडीचा वापर करून महाराष्ट्र सरकार पाडण्यात आले आणि नवे सरकार स्थापन झाल्याचे सांगण्यात आले आहे. या पद्धतीचा वापर करून महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नांवरही आवाज दाबला जात असल्याचे त्यांनी म्हटले असून असे प्रसंग बघून शेपूट घालणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे असंही त्यांनी म्हटले आहे.

टीएमसी प्रमुखांवरही निशाणा

शिवसेनेने प्रथमच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत टीएमसीच्या खासदारांनी किरकोळ कारणांमुळे मतदान केले नाही, हे आम्हाला गंभीर वाटत असल्याचे शिवसेनेकडून म्हटले आहे. बंगालमध्ये ईडी आणि सीबीआयच्या राजकीय कारवाया तीव्र झाल्या आहेत. राहुल आणि सोनिया गांधी यांनाही ईडीकडून त्रास देण्यात आला आहे. तरीही ते महागाई आणि बेरोजगारीविरोधात रस्त्यावर उतरल असल्याचे म्हणत त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची पाठराखण केली याहे.