सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मर्सिडीजने अखेर रिपोर्ट सोपवला, डिव्हायडरला गाडी आदळण्याच्या 5 सेकंदआधी…

| Updated on: Sep 10, 2022 | 4:18 PM

मर्सिडीज-बेंझच्या तज्ज्ञांचे पथक कारच्या तपासणीसाठी  सोमवारी हाँगकाँगवरून मुंबईला येणार आहे. कंपनीने कारमधील चिप विश्लेषणासाठी जर्मनीला पाठवली आहे. तसेच आरटीओनेही आपला अहवाल पालघर पोलिसांना दिला आहे.

सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मर्सिडीजने अखेर रिपोर्ट सोपवला, डिव्हायडरला गाडी आदळण्याच्या 5 सेकंदआधी...
अपघातग्रस्त कार
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  लक्झरी कार निर्मात्या मर्सिडीज बेंझने (mercedes benz) उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या भीषण अपघाताचा अंतरिम अहवाल पालघर पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अपघात होण्याच्या पाच सेकंदाआधी गाडीचे ब्रेक लावण्यात आले होते असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मर्सिडीज-बेंझच्या तज्ज्ञांचे पथक कारच्या तपासणीसाठी  सोमवारी हाँगकाँगवरून मुंबईला येणार आहे. कंपनीने कारमधील चिप विश्लेषणासाठी जर्मनीला पाठवली आहे. तसेच आरटीओनेही आपला अहवाल पालघर पोलिसांना दिला आहे. 12 सप्टेंबर रोजी ही टीम अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी कारची तपासणी करू शकते.  मिळालेल्या माहितीनुसार अपघातापूर्वी मिस्त्री यांची कार ताशी 100 किमी वेगाने जात होती. डॉ. अनाहिता पांडोळे यांनी डिव्हायडरला धडकण्याच्या पाच सेकंदापूर्वी ब्रेक लावला. ब्रेक लावल्यानंतर कारचा वेग 89 किमीपर्यंत कमी झाला. यादरम्यान कार दुभाजकाला धडकली.

अपघातात कारच्या 4 एअरबॅग उघडल्या

एसपी बाळासाहेब पाटील म्हणाले की, अपघाताच्या वेळी कारच्या चार एअरबॅग उघड्या होत्या. यामध्ये चालक डॉ. अनाहिता यांना तीन एअरबॅगचे संरक्षण मिळाले. समोरच्या दुसऱ्या सीटवर बसलेल्या दारियसच्या समोरची एअरबॅगही उघडली. डॉक्टर आणि तिचा पती दारियस रुग्णालयात दाखल आहेत. टाटा समूहाचे माजी प्रमुख मिस्त्री आणि कारच्या मागील सीटवर बसलेले जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

मर्सिडीज बेंझचे काय म्हणणे आहे?

मर्सिडीज बेंझने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करतो, त्यामुळे  आम्ही आमचे निष्कर्ष केवळ संबंधित तपस अधिकाऱ्यांना देऊ, याशिवाय आम्ही त्यांच्याशी सहकार्य करत आहोत आणि पुढे आवश्यकतेनुसार माहिती आणि स्पष्टीकरण थेट अधिकाऱ्यांना पाठवले जाईल.