AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2022: कधीपासून सुरु होत आहे पितृ पक्ष? या दिवसात पिंडदानाचे महत्त्व

2022 मध्ये, पितृ पक्ष 10 सप्टेंबर 2022 (शनिवार) ते 25 सप्टेंबर 2022 (रविवार) पर्यंत असेल. आई-वडील आणि पूर्वजांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धेने केलेल्या या विधीला पितृ श्राद्ध (Pitru Shradha)  म्हणतात. पितृपक्ष हा पितरांच्या स्मरणाचा काळ आहे.

Pitru Paksha 2022: कधीपासून सुरु होत आहे पितृ पक्ष? या दिवसात पिंडदानाचे महत्त्व
पितृपक्ष Image Credit source: Social Media
Updated on: Sep 05, 2022 | 12:15 PM
Share

हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधरा दिवसांना पितृ पक्ष म्हणतात. पितरांचे ऋण फेडण्याचा हा काळ असतो. पितृ पक्षात पिंडदानाचा (Pindadan) विधी वेगळा आहे. या दरम्यान पितरांच्या पुण्यतिथीला श्राद्ध केले जाते. पितृपक्षात पितरांचे स्मरण करून केलेले पिंडदान थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे.  2022 मध्ये, पितृ पक्ष 10 सप्टेंबर 2022 (शनिवार) ते 25 सप्टेंबर 2022 (रविवार) पर्यंत असेल. आई-वडील आणि पूर्वजांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धेने केलेल्या या विधीला पितृ श्राद्ध (Pitru Shradha)  म्हणतात. पितृपक्ष हा पितरांच्या स्मरणाचा काळ आहे. त्यामुळे या काळात शुभ कार्य, खरेदी आणि तीर्थयात्रेला विराम देण्यात येत असतो.

पितृ पक्षाचे महत्त्व

हिंदू धर्मानुसार, पितृलोकामध्ये तीन पिढ्यांचे आत्मा राहतात, जे स्वर्ग आणि पृथ्वीच्या दरम्यानचे स्थान मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार मृत्यूचा देव यम आहे, जो मृत व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवरून पितृलोकात घेऊन जातो. पुढच्या पिढीतील व्यक्ती मरण पावल्यावर पहिली पिढी स्वर्गात जाते आणि पुन्हा परमेश्वराशी जोडली जाते अशी मान्यता आहे. अशा प्रकारे पितृलोकात केवळ तीन पिढ्यांचे श्राद्ध समारंभ केले जातात, ज्यामध्ये यमाची भूमिका महत्त्वाची आहे. पंचांगानुसार, पितृ पक्षाच्या सुरुवातीला सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो.

श्राद्धशी संबंधित आख्यायिका

जेव्हा महाभारत युद्धात महान दाता कर्णाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला, जिथे त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली. तथापि, कर्णाला खाण्यासाठी खऱ्या अन्नाची गरज होती आणि त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्राला अन्न म्हणून सोने देण्याचे कारण विचारले. इंद्राने कर्णाला सांगितले की त्याने आयुष्यभर सोने दान केले, पण श्राद्धात आपल्या पितरांना कधीही अन्न दिले नाही. कर्ण म्हणाला की तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्याच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही. सुधारणा करण्यासाठी, कर्णाला 15 दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून तो श्राद्ध करू शकेल आणि त्याच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल. हा काळ आता पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.