..आणि अमित ठाकरेंच्या भोवती सेल्फीसाठी झुंबड !

| Updated on: Jan 23, 2021 | 4:52 PM

अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आज रुग्णवाहिकेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

..आणि अमित ठाकरेंच्या भोवती सेल्फीसाठी झुंबड !
Follow us on

मुंबई : शिवसेनेकडून ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी असलेल्या आदित्य ठाकरे यांना राजकारण पुढे आणल्यानंतर आता मनसेकडून ‘राज’पूत्र अमित ठाकरे राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशाला नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्त अमित ठाकरे यांच्या कामाचा रिपोर्टही मनसेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, युवावर्गात अमित ठाकरे यांची क्रेझ वाढत चालल्याचं आता पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आज रुग्णवाहिकेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छाही दिल्या.(Crowd of youth taking selfies with MNS leader Amit Thackeray)

मनसेकडून अमित ठाकरेंच्या कामाचं रिपोर्ट कार्ड

अमित ठाकरे यांचं वर्षभराचं रिपोर्ट कार्ड मनसेने जारी केलं आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती होऊन वर्षपूर्ती होत आहे. त्याबाबत मनसेने व्हिडीओ ट्रेलरच्या माध्यमातून अमित ठाकरेंचं रिपोर्ट कार्ड सादर केलं आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी अमित यांनी आरे कॉलनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. राज्यातील बंधपत्रित डॉक्टर्स नर्सेस यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी लावून धरली. करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या-आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी अमित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले, याकडे या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलं आहे.

अमित साहेब ठाकरे यांनी कोणते मुद्दे हाताळले?

 आरे कॉलनी म्हणजे मुंबईचा श्वास,मुंबईचा श्वास तोडण्याचे प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केले जात होते,पर्यावरणाचा विचार करून मनसे नेते श्री अमित ठाकरे यांनी ह्या आंदोलनात स्वतः सहभाग घेत,अनेक संघटनांच्या सहाय्याने हा मुद्दा निकालात काढला.

 राज्यातील बंधपत्रित डाॅक्टर्स आणि अधिपरिचारिका (नर्सेस) यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी मनसेच्या वतीने श्री अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आली.(८ जुलै २०२०)

 करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या- आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घ्यायला हव्यात. राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र लिहून “पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये तसंच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, यासंदर्भात आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा” अशी मागणी मनसेच्या वतीने श्री अमित ठाकरे ह्यांनी केली.

 आपल्या महाराष्ट्राची ‘राजभाषा’ मराठी आहे,प्रशासनची पत्रके हिंदी/इंग्रजी भाषेत येत होती.शासन आदेश मातृभाषेतून लोकांना कळावेत म्हणून मुख्य सचिवांना मनसेच्या वतीने मनसे नेते श्री अमित ठाकरे ह्यांनी पत्र लिहिले.

 महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांना खूपच कमी मोबदला दिला जात होता.त्यांना मिळणारा मोबदला वाढायला हवा ह्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची मनसे नेते श्री बाळा नांदगावकर यांच्यासह भेट घेतली.श्री अजित पवार यांनी मनसे नेते श्री अमित ठाकरे यांची ही मागणी मान्य करत आशा स्वयंसेवकांच्या वेतनात दुप्पट वाढ केली.

 कोरोना काळात बेड उपलब्धता असल्याचे नागरिकांना कळावे ह्यासाठी “App” विकसित करून कोरोना विषयक माहिती त्यावर प्रकाशित करावी,प्रत्येक रुग्णला रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, पोलीस कर्मचाऱ्यांना राखीव बेड असावेत अश्या मागणीसाठी मनसे नेते श्री अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

 कोरोनाच्या लढाईत सगळ्यात जास्त जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्याच( बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस) मानधनात कपात करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे नेते श्री अमित ठाकरे ह्यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले.

 आझाद मैदान येथील सभेनंतर तो संपूर्ण परिसर स्वच्छ करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांची भेट घेऊन मनसे नेते श्री अमित ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र सैनिकांची पाठ थोपटली.

संबंधित बातम्या : 

‘डॉक्टर हेच देव’, त्यांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘आरे’च्या लढ्याला यश; अमित ठाकरेंनी मानले मुख्यमंत्र्याचे आभार

Crowd of youth taking selfies with MNS leader Amit Thackeray