तुंबणाऱ्या मुंबईला वाचवण्यासाठी चक्क नेव्ही तैनात! 500 जवान मुंबईकरांना वाचवण्यासाठी सज्ज

| Updated on: Jun 03, 2022 | 2:12 PM

मुंबईमध्ये पावसाळ्या अनेक ठिकाणी पाणी साचतं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. झाल्यास नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी 20 जीवरक्षक तराफे सज्ज असतील. अग्निशमन दल, पोलीस व पेट्रोलिंग वाहने, 6 रेस्क्यू बोट्स, 12 तराफे, 42 लाइफ जॅकेट्स या सगळ्या गोष्टींसह पालिका सज्ज झाली आहे.

तुंबणाऱ्या मुंबईला वाचवण्यासाठी चक्क नेव्ही तैनात! 500 जवान मुंबईकरांना वाचवण्यासाठी सज्ज
पावसाळ्यासाठी पालिका सज्ज
Follow us on

मुंबई : सध्या पावसाच्या रिमझिम सरी बरसायला सुरूवात झाली आहे. अश्यात मुंबईकरांना चिंता सतावते ती तुंबणाऱ्या पाण्याची. कारण प्रत्येक पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचतं. त्यामुळे यंदा पावसाळ्याआधीच पालिका (Mumbai Municipal Corporation) सज्ज झाली आहे. साचणाऱ्या पाण्यावर उपाय योजना करण्यासाठी पालिकेने पावलं उचलली आहेत. एनडीआरएफची (NDRF) टीम तैनात केली जाणार आहे. 500 जवान यावेळी कार्यरत असतील. कुलाबा, वरळी, मानखुर्द, मालाड आणि घाटकोपरमध्ये नौदलाची पाच ‘पूर बचाव पथकं तैनात केली जाणार आहेत.

एनडीआरएफची टीम तैनात

यंदाच्या पावसाळ्यात एनडीआरएफची टीम तैनात केली जाणार आहे. 500 जवान यावेळी कार्यरत असतील. ‘पूर बचाव पथकंही तैनात केली जाणार आहेत.

कोणत्या भागात किती पथकं

कुलाबा, वरळी, मानखुर्द, मालाड आणि घाटकोपरमध्ये नौदलाची पाच ‘पूर बचाव पथकं तैनात केली जाणार आहेत. अंधेरीत तीन आणि संभाव्य दरड कोसळणाऱ्या ठिकाणी दोन ‘एनडीआरएफ’ची पथकं सज्ज ठेवली जाणार आहेत. त्यामुळे दरड कोसळल्यास तातडीने मदत मिळेल. यात नेव्हीचे अधिकारी आणि सैनिकांचा समावेश असणार आहे. 500 जणाची टीम आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी कार्यरत असेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पावसाळ्याच्या तोंडावर भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना आखण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यासाठी यंत्रणा सज्ज