Rajya Sabha election : राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषद? देवेंद्र फडणवीसांची भेट घेत मविआ नेत्यांचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव

विधानपरिषदेसाठी पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव भाजपला या भेटीदरम्यान देण्यात आला आल्याचं सूत्रांनी म्हटलंय.

Rajya Sabha election : राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषद? देवेंद्र फडणवीसांची भेट घेत मविआ नेत्यांचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव
महत्वाची बैठक
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 11:32 AM

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. विधानपरिषदेसाठी पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव भाजपला (BJP) या भेटीदरम्यान देण्यात आला आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. त्या बदल्यात भाजपने आपल्या राज्यसभेचा (Rajya Sabha election) उमेदवार मागे घ्यावा, असा प्रस्ताव देण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप मात्र राज्यसभेच्या तिसऱ्या उमेदवाराबाबत ठाम असल्याची माहिती मिळतेय. सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ, सागर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळात छगन भुजबळांच्या नेतृत्वात, अनिल देसाई, सुनील केदार, सतेज पाटील या नेत्यांचा समावेश होता.

भाजपची काय भूमिका?

राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता निवडणूकीतून माघार नाहीच, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाल्याचाही भाजपमधील सूत्रांकडून करण्यात आलाय. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अशातच भाजप उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाही, असं सांगितलं जातंय.

हे सुद्धा वाचा

कुणाला उमेदवारी?

आता राज्यसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. शिवसेनेने आपले दोन उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार हे जाहीर केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहे.

6 जागासाठी 7 उमेदवार रिंगणात

  1. संजय राऊत, शिवसेना
  2. संजय पवार, शिवसेना
  3. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी
  4. इम्रान प्रतापग्रही, काँग्रेस
  5. पियुष गोयल, भाजप
  6. अनिल बोंडे, भाजप
  7. धनंजय महाडिक, भाजप

काँग्रेसनेही उमेदवरांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून जाहीर झालेलं नावं हे अपेक्षेप्रमाणेच सरप्राईजिंग आहे. कारण राज्यसभेसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापग्रही यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत इम्रान प्रतापग्रही?

  1. मोहम्मद इम्रान प्रतापग्रही हे उर्दू भाषेतील कवी आणि मूळचे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते आहेत.
  2. प्रतापग्रही हे 2019 च्या निवडणुकीत मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले मात्र ते पराभूत झाले.
  3. इम्रान यांची 3 जून 2021 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  4. यावेळी काँग्रेसकडून त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसकडून कन्हैया कुमार यांचेही नाव चर्चेत होते. मात्र आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.