होळी, धुळवडीसाठी तरुणाईत उत्साह, मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त, कुठे काय खबरदारी?

Mumbai Police : मुंबईत होळी आणि धुळवडीच्या उत्साहात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सणाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस खास काळजी घेताना दिसत आहेत.

होळी, धुळवडीसाठी तरुणाईत उत्साह, मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त, कुठे काय खबरदारी?
Holi and Mumbai Police
Image Credit source: Google
| Updated on: Mar 02, 2026 | 7:20 PM

संपूर्ण राज्यात होळीचा आणि धुळवडीचा उत्साह पहायला मिळत आहे. मुंबईत होळी आणि धुळवडीच्या उत्साहात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जुहू चौपाटीवर सध्या होलीका दहनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सणाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस खास काळजी घेताना दिसत आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गैरकृत्य करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार

धुळवडीला अनेकदा काही लोक इतरांना जबरदस्तीने रंग लावण्याचा प्रयत्न करतात. तसेच काही हुल्लडबाज मुले पाण्याने किंवा रंगाने भरलेले फुगे लोकांवर फेकतात. यामुळे अनेकदा वाद निर्माण होतो. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. धुळवडीच्या दिवशी कायदा हातात घेणाऱ्यांना पोलिसांकडून धडा शिकवला जाणार आहे. नागरिकांनी नियम पाळून आनंद साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नियम पाळून आनदांने सण साजरा करण्याचे आवाहन

मुंबई पोलिसांनी होळी आणि धुळवडीसाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. सणाच्या काळात कोणताही गैरप्रकार, जबरदस्तीने रंग लावणे, रंगीत पाण्याचे फुगे फेकणे, अश्लील वर्तन किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृतींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे गैरकृत्य करणाऱ्यांना आळा बसणार असून नागरिकांना आनंदाने सण साजरा करता येणार आहे.

शहरातील प्रमुख भागांवर पोलिसांची नजर असणार

मुंबई शहरात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. इमारती, कार्यालये आणि इतर ठिकाणीही या सणांचा मोठा उत्साह पहायला मिळतो. यंदा कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, गृहनिर्माण सोसायट्या, प्रमुख चौक, समुद्रकिनारे आणि गर्दीच्या भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us