चित्रपटात महिलांच्या अपमान करणाऱ्या संवादावर मुंबई पोलिसांचं बोट, म्हणाले, ” हे चित्रपटातही शोभत नाही”

| Updated on: Oct 02, 2021 | 9:45 AM

चित्रपटातून महिलांबद्दल अनेकदा चुकीची वक्तव्य केली जातात. अगदी आघाडीचे बॉलीवूड अभिनेते असे डायलॉग चित्रपटात बोलतात, असेच काही डायलॉग निवडून मुंबई पोलिसांनी महिलांबद्दलच्या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणा असं म्हटलं आहे.

चित्रपटात महिलांच्या अपमान करणाऱ्या संवादावर मुंबई पोलिसांचं बोट, म्हणाले,  हे चित्रपटातही शोभत नाही
मुंबई पोलिसांनी चित्रपटात महिलांचा अपमान करणारे संवाद शेअर केले आहेत, जे चूक असल्याचं पोलीस म्हणतात
Follow us on

मुंबई: मुंबई पोलीस सोशल मीडियावर चांगलेच एक्टीव्ह आहेत. समाजाच्या रक्षणाची, त्यात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी थांबवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. मात्र हे करताना मुंबई पोलीस आपली वेगळी छाप सोडताना दिसतात. असंच एक अभियान मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर चालवलं आहे. चला गैरसमज दूर करुया असं म्हणत मुंबई पोलिसांनी महिलांबद्दल समाजात पसरवण्यात आलेल्या चुकीच्या गोष्टींला विरोध केला आहे. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं, मात्र या चित्रपटातून महिलांबद्दल अनेकदा चुकीची वक्तव्य केली जातात. अगदी आघाडीचे बॉलीवूड अभिनेते असे डायलॉग चित्रपटात बोलतात, की जे त्यावेळी ऐकायला भारी वाटतात, पण खऱ्या आयुष्यात ते स्रियांचा अपमान करणारेच आहेत. असेच काही डायलॉग निवडून मुंबई पोलिसांनी महिलांबद्दलच्या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणा असं म्हटलं आहे. ( Mumbai police share dialogues in films insulting women on social media. Think about it )

मुंबई पोलिसांनी या अभियानासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटचा उपयोग केला आहे. या अकाऊंटवर पोलिसांकडून कबीर सिंग, हम तुम्हारे है सनम, दिल धडकने दो, दगंब आणि मालामाल या चित्रपटांचे काही डायलॉग शेअर केले आहे. हेच डायलॉग आपण जेव्हा चित्रपटात पाहतो, तेव्हा ते फार भारी वाटतात, त्यांचं कुणाला काही वाटत नाही, अगदी ज्या महिलांचा अपमान या संवादातून होतो, त्यांनाही त्याबद्दल काही वाटत नाही, मात्र, मुंबई पोलिसांनी जेव्हा जे संवाद शेअर केले, तेव्हा त्यातून महिलांचा किती अपमान होतो हे कळतं.

कुठलाही शब्द उच्चारण्याआधी विचार करा

दरम्यान, या संवादाचे फोटो शेअर करताना पोलिसांनी एक संदेशही कॅप्शनमध्ये लिहला आहे. त्यात लिहण्यात आलं आहे की,’ इथं फक्त काही संवाद आहे, ज्यावर आपल्या समाजाला आणि चित्रपटांना विचार करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपले शब्द काळजीपूर्वक वापरा, आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवा, असं केलं तर कायद्याला हस्तक्षेप करावा लागणार नाही. आपण वापरत असलेल्या प्रत्येक शब्द उच्चारण्याआधी विचार करा, दैनंदिन जीवनात आणि चित्रपटात वापरलेली भाषा ही आपल्या विचारांचं प्रतिबंबं आहे’ हा संदेश लिहताना पोलिसांनी #LetsNotNormaliseMisogyny #MindYourLanguage #WomenSafety हे 3 हॅशटॅग वापरले आहेत. म्हणजेच चला गैरसमज दूर करुया, शब्द विचार करुन वापरा आणि महिला सुरक्षा असा संदेश यातून पोलिसांना द्यायचा आहे.

काय आहेत चित्रपटातील हे संवाद?

कबीर सिंग या चित्रपटातील पहिला संवाद आहे, ज्यात कबीर सिंग अभिनेत्रीला म्हणतो, ”प्रीती, चुन्नी ठीक करो” महिलांना कसं राहावं, कसं वागावं यावर अभिनेता नियंत्रण ठेवताना दिसतो. शिवाय, पुरुषी मानसिकता या संवादातून थेट जाणवते.

2002 मध्ये रिलीज झालेल्या हम तुम्हारे है सनम चित्रपटातील दुसरा संवाद आहे, ज्यात अभिनेता शाहरुख खान अभिनेत्रीला म्हणतो, “तुम एक पत्नी हो, तुम्हारा पती जैसा चाहेगा, वैसाही होगा…ये शादी का दस्तूर है, मर्द औरत का भगवान होता है” यातूनही महिलांबद्दल पुरुषांचं काय मत आहे हे स्पष्ट दिसतं.

1988 साली आलेल्या मालामाल चित्रपटातील एक संवादही पोलिसांनी शेअर केला आहे, ज्यात एक पात्र दुसऱ्या पात्राला महिलेबद्दल सांगतं की, “अगर खुबसूरत लडकी को ना छेडो, तो वो भी तो, उसकी बेइज्जती होती है” देशभरात महिला छेडछाडीच्या घटना दररोज घडताना दिसतात, त्यातून मोठे गुन्हेही होतात, पोलीस हे थांबवण्यासाठी प्रयत्न करतात, पण चित्रपटातून अशाच चुकीच्या कृतींचं उदात्तीकरण केलं जातं.

2015 साली आलेल्या, दिल धडकने दो चित्रपटातील एक संवादही इथं शेअर करण्यात आला आहे, ज्यात अभिनेता त्याच्या बायकोबद्दल बोलताना म्हणतो, “But I allow Ayesha to run her Business” म्हणजे मी आयशाला व्यवसाय चालवण्याची परवानगी देतो. यावरुन आजही महिलांना काही करण्यासाठी पुरुषांची परवानगी घ्यावी लागते हे स्पष्ट दिसतं, याला काऊंटर डायलॉगही चित्रपटात आहे, जो पोलिसांनी इथं दिलेला नाही, मात्र, त्यात या अभिनेत्रीचा आधीचा प्रियकर जो फरहान अख्तर दाखवला आहे, तो म्हणतो, “तू तिला परवानगी देणारा कोण? ती स्वतंत्र आहे आणि ती स्वतंत्रपणे काम करु शकते.” यावरुन दोघांमध्ये झालेली बाचावाची या सीनमध्ये दाखवण्यात आली आहे.

अजून अशाच अनेक चित्रपटातील संवाद पोलिसांनी शेअर केले आहेत, ज्यावर खऱंच विचार करण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांची पोस्ट:

हेही वाचा:

मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, प्रवास करत असाल तर या वेळा लक्षात ठेवा!

Mumbai School Reopen : आठवड्यात तीन दिवस निर्जंतुकीकरण, पालकांच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश : किशोरी पेडणेकर