VIDEO | भांडुपमध्ये मॅनहोलची दुरवस्था पुन्हा नागरिकांच्या जीवावर, दोघे पडता-पडता थोडक्यात बचावले

| Updated on: Jul 20, 2021 | 2:01 PM

भांडूपच्या व्हिलेज रोड परिसरात पुन्हा एकदा मॅनहोलच्या दुरावस्थेमुळे फुटपाथवरुन चालणाऱ्या नागरिकाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे.

VIDEO | भांडुपमध्ये मॅनहोलची दुरवस्था पुन्हा नागरिकांच्या जीवावर, दोघे पडता-पडता थोडक्यात बचावले
Bhandup cctv manhole
Follow us on

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरात पुन्हा एकदा मॅनहोलच्या दुरावस्थेमुळे फुटपाथवरुन चालणाऱ्या नागरिकाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Mumbai Rains Man Fall in open manhole near Bhandup CCTV Video Viral)

मॅनहोलची दुरावस्था नागरिकांच्या जीवावर

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे मॅनहोलला असणारी फायबरची झाकणे पाण्याच्या प्रवाहामुळे उघडली गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे फुटपाथवर चालत असताना एका व्यक्तीचा अचानक मॅनहोलमध्ये पाय गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे फुटपाथवरील मॅनहॉलची दुरावस्था ही नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे बोललं जात आहे. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

व्हिडीओत नेमकं काय? 

या सीसीटिव्ही व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, सुरुवातीला एक व्यक्ती फुटपाथवर साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जात आहे. त्याचा पाय एका मॅनहोलच्या झाकणावर पडल्याने तो पडतो. त्यानंतर काही वेळाने दुसरा व्यक्ती त्या ठिकाणाहून जात असताना त्याचाही मॅनहोलच्या झाकणावर पाय पडतो आणि तो व्यक्ती थेट खाली पडतो. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे पथक संबंधित ठिकाणी झाले आहे. त्यांनी तातडीने हा मॅनहोल दुरुस्त केला आहे.

पाहा व्हिडीओ : 

संबंधित बातम्या : 

Special Report | मुंबईतील उघडे मॅनहोल कधी झाकणार? भांडुप दुर्घटनेनंतर मनपाचे डोळे उडणार का?

Mumbai Rain | मुंबईतील दरडी जीवघेण्या, 29 वर्षात 290 लोकांनी प्राण गमावले