Hasan Mushrif: अजित पवार आम्हाला सहकार्य करतात हे खरं की…; अजितदादा आमच्यावर अन्याय करतात हे खरं; हसन मुश्रीफांनी घेतला बंडखोरांचा समाचार

| Updated on: Aug 22, 2022 | 12:57 PM

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बंडखोर आमदार आता ज्याप्रमाणे बोलतात ते आताचे खरे मानायचे की गुवाहाटीतील खरं मानायचा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Hasan Mushrif: अजित पवार आम्हाला सहकार्य करतात हे खरं की...; अजितदादा आमच्यावर अन्याय करतात हे खरं; हसन मुश्रीफांनी घेतला बंडखोरांचा समाचार
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) असताना शिवसेनेतून बंडखोरी करत मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार केले. त्यानंतर बंडखोर शिंदे गटावर प्रचंड टीका शिवसेनेतून आणि शिवसेनेचे मित्र पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीतून जोरदार टीका करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबरोबर ज्या 40 पेक्षाही जास्त आमदारांनी बंडखोरी केली त्या अनेक आमदारांनी ज्याप्रमाणे शिवसेनेवर टीका केली त्याचप्रमाने त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार तत्कालीन मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. बंडखोर आमदारांना त्यांच्या बंडाचे कारण विचारले जात होते, त्यावेळी आमदार शहाजी पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीवर (Shivsena-NCP) ठपका ठेवला.

मविआमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्यावर अन्याय करतात, आम्हाला निधी देताना दुजेबाव करतात असा आरोपही त्यावेळी त्यांच्यावर करण्यात आला होता, तर आता शिंदे-फडणवीस गटांनी सत्तास्थापन केल्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे.

गुवाहाटीचं खरं की आताचं खरं…

त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, मंत्री गुलाबराव आज सभागृहात सांगतात की, मागच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला सहकार्य करतात,हे वक्तव्य खरं मानायचं की, गुवाहाटीला जाऊन सांगतात अजितदादा आमच्यावर खूप अन्याय करतात हे वाक्य खरं मानायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस आणि राष्ट्रवादीचा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे.

गुलाबराव पाटलांचा घेतला समाचार

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बंडखोर आमदार आता ज्याप्रमाणे बोलतात ते आताचे खरे मानायचे की गुवाहाटीतील खरं मानायचा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

बंडखोर आमदार टीकेची धनी

शिंदे-फडणवीस गटातील आमदार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका होत असताना बंडखोर आमदारांवर प्रचंड टीका केली जात आहे. कालही सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर शिवसेनेचे नेते गणेश हाके यांनीही शहाजी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती.