दहावीच्या नापास विद्यार्थ्यांना 20 गुण?

| Updated on: Jun 18, 2019 | 2:40 PM

विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांचा मुद्दा चांगलाच तापला. शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभु यांनी दहावीच्या नापास विद्यार्थ्यांना काय दिलासा देणार असा थेट प्रश्न नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना विचारला.

दहावीच्या नापास विद्यार्थ्यांना 20 गुण?
Follow us on

मुंबई : विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांचा मुद्दा चांगलाच तापला. शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभु यांनी दहावीच्या नापास विद्यार्थ्यांना काय दिलासा देणार असा थेट प्रश्न नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना विचारला. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात सुनिल प्रभु म्हणाले, “दहावीच्या सर्व भाषिक विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केले. त्यामुळे त्यांना प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. हे अंतर्गत कमी केल्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाले असून त्यांचे मोठे नुकसान झाले. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिक्षणमंत्र्यांनी कोणते पाऊल उचलले याची माहिती सभागृहासमोर द्यावी.”

प्रभु यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, “दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीसाठी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून विज्ञान शाखेत 5 टक्के आणि इतर शाखांमध्ये 8 टक्के जागा राखीव ठेवल्या जातील. तसेच नापास विद्यार्थ्यांची जुलैमध्ये फेरपरिक्षा घेण्यात येईल. यात अंतर्गत 20 गुणांमुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळेल.”

फेरपरिक्षेच्यावेळी नापास विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये संबंधित अंतर्गत 20 गुण समाविष्ठ केले जातील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.