मुंबई : फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, असं म्हणत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या (बुधवार-गुरुवार) दिवसभर कामबंद आंदोलन पुकारलं आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील परिचारिका संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. (nurses Agitation for various Demand)
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आलं आहे. पाठीमागचे 2 दिवस परिचारिकांनी सकाळी 2 तास काम बंद आंदोलन केलं पण कोणत्याही मागण्या न झाल्याने आता दोन दिवस कामबंद आंदोलन असणार आहे.
सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढे 25 तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरु करु, असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे. बेमुदत संपावर जाण्याआधी सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा, असंही परिचारिका संघटनांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या काळात आम्ही कुठे कामात थांबलो नाही , काम केलं आता सरकार मात्र आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही ही खेदाची बाब असल्याची खंत परिचारिका संघटना व्यक्त करत आहेत.
राज्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सकडून 21 जूनपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयातील नर्सने कामबंद आंदोलन केले. यात जे.जे. रुग्णालयातील 375, सेंट जॉर्ज रुग्णालयातील 175 आणि जीटी रुग्णालयातील 100 परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्याचसोबत राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
(nurses Agitation for various Demand)
हे ही वाचा :
Breaking | केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, मुंबईत जेजे रुग्णालयात नर्सचं आंदोलन